वडाळा कार पार्किंग बांधकाम कोसळलं, मुंबईत वादळी वाऱ्याचं थैमान!

ताशी शंभरपेक्षा जास्त वेगाने वारे वाहू लागल्याने अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. त्यामुळे रेल्वे वाहतुकीसह विमान वाहतुकीवर सुद्धा विपरित परिणाम झाला.

  मुंबई : मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई उपनगर परिसर, नवी मुंबई आणि ठाणे शहरातील अनेक भागांत आज दुपारपासून धुळीच्या वादळानं थैमान घातलं आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर मुसळधार पावसाळा सुरुवात सुद्धा झाली आहे. या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी बरेच नुकसान झाले आहे. ताशी शंभरपेक्षा जास्त वेगाने वारे वाहू लागल्याने अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. त्यामुळे रेल्वे वाहतुकीसह विमान वाहतुकीवर सुद्धा विपरित परिणाम झाला आहे. (फोटो सौजन्य – ABP Maza)

  मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प
  मुलुंड आणि ठाणे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरचा खांब कोसळून मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरची वाहतूक पूर्णतः बंद झाल्या आहेत. या घटनेमुळे मुंबईमधील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

  वडाळामध्ये श्रीजी टॉवर्सचे पार्किंग स्ट्रक्चर कोसळलं
  वडाळा पूर्व या ठिकाणी असलेल्या श्रीजी टॉवर्सचे पार्किंग स्ट्रक्चर खाली कोसळलं आहे. याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

  पेट्रोल पंपवर कोसळली होर्डिंग्ज
  घाटकोपरमध्ये आझाद बिल्डिंगच्या बाजूला असलेल्या पेट्रोल पंपवर मोठी होर्डिंग्ज कोसळल्याची घटना घडली. या घटनेमध्ये जीवितहानी झाली आहे की नाही याबाबत अजुनपर्यत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, तरी पेट्रोल पंपावर होर्डिंग्ज कोसळल्याने अनेकजण दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे.