Wadner's police inspector abuses woman, lures Bramhapuri police

ब्रम्हपुरी शहरातील रहिवासी असलेल्या पीडित महिलेशी ओळख झाली. ब्रम्हपुरी येथे कार्यरत असताना आरोपी यांनी सदर पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ब्रम्हपुरी पासून आरोपी हा वेगवेगळ्या ठिकाणी बदलून गेला, त्या त्या ठिकाणी तो पीडित महिलेला बोलावत लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करत होता.

    वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथे पोलीस निरक्षक म्हणून कार्यरत असलेले पोलीस अधिकारी राजेंद्र शेटे यांच्या विरोधात ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनमध्ये १५ वर्षांपूर्वी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले व सध्या वडनेर येथे पोलीस निरक्षक असलेले  पोलीस अधिकारी राजेंद्र शेटे यांनी मागील १५ वर्षांत लग्नाचे आमिष दाखवत वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून अत्याचार केले.

    ब्रम्हपुरीत एका महिलेच्या तक्रारीवरून पोलीस अधिकारी राजेंद्र शेटे यांच्या विरोधात ब्रम्हपुरी पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार, आरोपी राजेंद्र शेटे हे २००७ वर्षा दरम्यान ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. तेव्हा त्यांची ब्रम्हपुरी शहरातील रहिवासी असलेल्या पीडित महिलेशी ओळख झाली. ब्रम्हपुरी येथे कार्यरत असताना आरोपी यांनी सदर पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ब्रम्हपुरी पासून आरोपी हा वेगवेगळ्या ठिकाणी बदलून गेला, त्या त्या ठिकाणी तो पीडित महिलेला बोलावत लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करत होता.

    नुकतेच आरोपीने ३० मार्च २०२२ रोजी फिर्यादी महिलेला नागभीड तालुक्यातील घोडझरी येथे भेटायला बोलावले होते. दरम्यान, फिर्यादी महिलेने लग्नाबद्दल विचारले असता भांडण होऊन आरोपीने तिला मारहाण केली. तसेच, जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडित महिलेने सदर प्रकरणाची तक्रार ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलिसांनी आरोपी पोलीस  अधिकारी राजेंद्र शेटे विरोधात भादंवि कलम ३७६ (२) (एन), ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

    सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस  अधीक्षक अरविंद साळवे यांनी ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनला भेट दिल्याची माहिती आहे.