Waiting for Baliraja for heavy rain, not drizzle! Vehicles in the deer constellation are also betraying donkeys

सिंचनाच्या सोयी असलेल्या शेतकऱ्यांनी पेरणी उरकुन घेतली असली तरी अती उष्णतेच्या तडाख्यात कोवळे पीक करपण्याचा धोका वाढला आहे. कारण, उन्हाळ्यातच भूगर्भातील पाणी आटल्याने शेतातील सिंचनाच्या विहिरीची पाण्याची पातळी खाली गेली. त्यामुळे विद्युत पंपांना पाणी पुरत नाही.

  गोंदिया : रोहिणी नक्षत्र कोरडा गेल्यावर शेतकऱ्यांच्या नजरा मृग नक्षत्रावर होत्या. या नक्षत्रात तरी दमदार पाऊस पडणार, अशी आशा असताना मृग नक्षत्राच्या गाढवाने दगा दिला असून जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्याने शेतकरी दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.

  हवामान खात्याने यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस येणार व नियोजित वेळापेक्षा लवकर पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु, मृग नक्षत्रात दमदार पाऊस आलाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यात निराशा पसरली आहे. यावर्षी चांगला पाऊस पडणार, अशी आशा शेतकऱ्यांना असताना पाऊस अत्यल्प पडला. शिवाय शेतजमिनही ओलीचिंब झाली नाही. त्यामुळे पेरणी केलेल्या कोवळ्या पिकालाही उष्णतेची झळ बसत आहे. एकंदरीत धान पिकाची पेरणीही दमदार पावसाविना रखडली आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज घेत शेतकरी पेरणी करीत असला तरी दुबार पेरणीचे सावट येणार तर नाही ना ! याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

  सिंचनाच्या सोयी असलेल्या शेतकऱ्यांनी पेरणी उरकुन घेतली असली तरी अती उष्णतेच्या तडाख्यात कोवळे पीक करपण्याचा धोका वाढला आहे. कारण, उन्हाळ्यातच भूगर्भातील पाणी आटल्याने शेतातील सिंचनाच्या विहिरीची पाण्याची पातळी खाली गेली. त्यामुळे विद्युत पंपांना पाणी पुरत नाही. एका तासातच विहिरीतील पाणी समाप्त होत आहे. विहिरीतच नाही तर पोहऱ्यात पाणी कुठले येणार ? अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. अखेरच्या टप्प्यात मृग नक्षत्रात पाऊस येणार, अशी आशा असताना मृगाचे वाहनही वाढव दगा देत आहे. त्यामुळे, शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे.

  विजेच्या लपंडावाने शेतकरी त्रस्त

  अधून मधून विजेचा लपंडाव सुरू असतो. त्यामुळे, शेतकऱ्यांना धान पऱ्हांना सिंचनाचे पाणी देणे अडचणीचे जात आहे. त्यासाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

  पेरण्या लांबल्या

  खरीप हंगाम सुरू झाला असून जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून रिपरिप पाऊस बरसत आहे. या पावसाचे पाणी जमिनीत विरले नाही. त्यामुळे, शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली नाही. परिणामी, पेरण्या लांबल्या आहेत.