VIDEO! “बोलून मोकळं व्हायचं – CM”, “हो – अजित पवार”, “माईक चालू आहे – फडणवीस…”; मराठा आरक्षणावर व्हीडिओ व्हायरल, नेमका काय आहे प्रकार? पाहा…

एकीकडे समाज जीवन मरणाचा संघर्ष शांततेच्या माध्यमातून करीत असताना सरकारचे हे ट्रीपल इंजिन बघा किती गांभीर्याने हा विषय घेत आहेत.. आरक्षण देण्याची दानत नसेल तर तसे सांगा पण, किमान जखमेवर मीठ तरी चोळू नका. समाज आता तुमच्याकडे डोळसपणे बघतोय.

    मुंबई – सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मागील १६ दिवसांपासून मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) हे उपोषणला बसले आहेत. जालन्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर राज्यभर पडसाद उमटत असताना, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरक्षणावरुन एक व्हीडिओ समोर आला असून, हा व्हीडिओ मोठया प्रमाणात व्हायरल होत आहे. यावरुन एकनाथ शिंदेंवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. सतत मराठा समाजाला न्याय देऊ, कोणावरही अन्याय करणार नाही, असं नेहमी ठामपणे शिंदे म्हणत असतात, मात्र “बोलून मोकळं व्हायचं” ह्या त्यांच्या एका व्हीडिओवरुन त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे, मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ व्हिडीओ ओमराजे निंबाळकर यांनी ट्विट केला आहे. (want to be free to speak cm yes ajit pawar mike is on fadnavis video viral on maratha reservation what exactly is the type)

    मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणाची अनास्था

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत अनेकदा आपले सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अत्यंत गंभीर असल्याचं म्हणताहेत. पण त्यांच्या ह्या व्हिडिओमुळे मराठा आरक्षणाच्या आस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांना करायचे होते. त्यावेळी त्यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांसह पत्रकार परिषेद घेतली. या पीसीला सामोरी जाण्यापूर्वी “आपण केवळ बोलून मोकळे व्हायचे…” असं शिंदे म्हणाले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यानंतर शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत असून, हेच का ह्यांचे मराठी प्रेम? असा प्रश्न उपस्थित केला जाता आहे.

    व्हीडिओतील काय आहे संवाद?

    या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी या तिन्ही नेत्यांना ट्रोल केले जात आहे. मराठा आरक्षणासाठी सोमवारी रात्री सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद सुरु करण्यापूर्वी खुर्चीवर बसण्यापूर्वी सरकारमधील या तीन प्रमुख नेत्यांच्या संवादातील व्हीडिओ प्रचंड व्हायरल होत असून, या व्हीडिओनंतर लोकं लाखोली वाहत आहेत.

    एकनाथ शिंदे – “आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं, बोलून मोकळं व्हायचं.”

    अजित पवार – “हो……येस’

    देवेंद्र फडणवीस – “माईक चालू आहे.” (यानंतर तिघे हसतात…, असं व्हीडिओत दिसतेय.)

    दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन होत आहेत, न्याय मिळावा, यासाठी मराठा तरुण पेटून उठला आहे. तरीही हे सरकार केवळ वेळकाढूपणा करीत आहे. एकीकडे जरांगे पाटील उपोषण करत आहेत, त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न असताना, हे ट्रीपल इंजिन सरकार बघा किती गांभीर्याने हा विषय घेत आहे, असा सवाल उपस्थित केला जातोय.

    काय आहे ओमराजेंचं ट्विट?

    “मराठा आरक्षणासाठी काल रात्री सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी सरकारमधील या तीन प्रमुख नेत्यांतील संवाद तरी पाहा. “आपण बोलून मोकळं व्हायचं” हे त्यांचे उद्गार मराठा आरक्षण प्रश्नी त्यांची असलेली अनास्था दर्शवित आहे. मराठा आरक्षणासाठी सर्व समाजबांधव पोटतिडकीने राज्यभर आंदोलन करीत आहेत. अनेकांनी अन्नत्याग केला आहे. विविध माध्यमातून राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न आपला मराठा तरुण करताना दिसतो आहे. तरीही हे सरकार केवळ वेळकाढूपणा करीत आहे. एकीकडे समाज जीवन मरणाचा संघर्ष शांततेच्या माध्यमातून करीत असताना सरकारचे हे ट्रीपल इंजिन बघा किती गांभीर्याने हा विषय घेत आहेत.. आरक्षण देण्याची दानत नसेल तर तसे सांगा पण, किमान जखमेवर मीठ तरी चोळू नका. समाज आता तुमच्याकडे डोळसपणे बघतोय…”