राज्यात वॉन्टेड असणाऱ्या टोळीला बीड पोलिसांनी केली अटक; टोळीवर 70 पेक्षा जास्त गुन्हे दाखल

राज्यात वॉन्टेड असणारा आणि बीड जिल्ह्यात 25 गुन्हे दाखल असलेला आटल्या भोसलेसह इतर दोन साथीदाराला बीड पोलिसांनी (Beed Police) जेरबंद केले आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आटल्या भोसले याच्यावर राज्यात 70 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.

    बीड : राज्यात वॉन्टेड असणारा आणि बीड जिल्ह्यात 25 गुन्हे दाखल असलेला आटल्या भोसलेसह इतर दोन साथीदाराला बीड पोलिसांनी (Beed Police) जेरबंद केले आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आटल्या भोसले याच्यावर राज्यात 70 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.

    राज्यातील सर्वच पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, अनेकदा पोलिसांना गुंगारा देण्यात आटल्या भोसलेला यश मिळायचे. पण बीड आणि आष्टी पोलिसांनी राखीव पोलीस दलाची मदत घेऊन आटल्यासह त्याच्या दोन साथीदारांना जेरबंद केले. हे सर्वजण दरोडाच्या तयारीत असतानाच बीड पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. तर त्यांच्याकडून धारदार शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले.