तळोजा येथे भंगार गोदामाला आग; जीवितहानी नाही

या औद्योगिक क्षेत्रात बेकायदेशीर भंगारच्या धंद्यांना ऊत आला असून यामुळे अनेक आगीच्या घटना घडत आहेत. येथील बेकायदेशीर भंगार गोदामात प्लास्टिकसह लाकडी आणि इतर सामान मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानकपणे आग लागून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असलेले भंगार साहित्य भस्मसात झाले आहे.

    तळोजा : तळोजा औद्योगिक क्षेत्रातील (MIDC, Talaoja) नावडे फाटा (Navade Phata) येथील भंगार गोदामाला (Scrap Godown) लागलेल्या आगीत (Fire) मोठे नुकसान झाले आहे, मात्र सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. या आगीला सर्वस्वी औद्योगिक मंडळ जबाबदार असल्याची संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते सुरेश पाटील (Suresh Patil, Congress Leader) यांनी दिली आहे.

    या औद्योगिक क्षेत्रात बेकायदेशीर भंगारच्या धंद्यांना ऊत आला असून यामुळे अनेक आगीच्या घटना घडत आहेत. येथील बेकायदेशीर भंगार गोदामात प्लास्टिकसह लाकडी आणि इतर सामान मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानकपणे आग लागून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असलेले भंगार साहित्य भस्मसात झाले आहे.

    आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तळोजा (Taloja), नवी मुंबई (Navi Mumbai), कळंबोली (Kalamboli), पनवेल (Panvel) बंब घटनास्थळी जाऊन पोहोचले व त्यांनी पाच तास शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा भंगार माफियांचे जाळे पसरत चालले असून त्यांच्यावर संबधित खात्याने कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

    या क्षेत्रातील वाढत्या भंगाराच्या धांद्याबाबत तळोजा औद्योगिक विकास मंडळ अधिकारी यांना वारंवार तक्रार करून सुध्दा भंगाराच्या धंद्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. गेल्या वर्षी सिलिंडरचा स्फोट होऊन भंगाराच्या गोदामाला आग लागली होती. त्यात एक व्यक्ती मारता मारता वाचली होती. अशा वारंवार घटना घडत असताना या भंगारच्या गोदामाला कोणाचा आशीर्वाद आहे, असा सवाल नागरिक विचारत आहेत.