वारकरी भवनाच्या उभारणीसाठी निधी कमी पडून देणार नाही, सर्व पक्षीय नेत्यांचा वारकऱ्यांना शब्द

उपस्थित मान्यवरांनी “वारकरी भवन आणि महिला उद्योग भवनाच्या” उभारणीसाठी निधी कमी पडून देणार नसल्याचा शब्द सर्व पक्षीय नेत्यांनी वारकऱ्यांना दिला.

    कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात प्रशस्त वारकरी भवन व्हावं ही वारकरी संप्रदायाची अनेक वर्षांपासून मागणी होती. वारकरी संप्रदायाच्या मागणी प्रमाणे कल्याण शहरात वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधत्व करणाऱ्या श्री. ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय वारकरी सेवाभावी ट्रस्टला महापालिकेने मौजे गंधारे माधव संकल्प इमारतीच्या बाजूला असलेला १२८४ चौ मीटर भूखंड भाडेतत्वार उपलब्ध करून दिला. याच भूखंडावर सदर कामाच्या नामफलकाचा अनावरण सोहळा आदर्श आचारसहितेचे पालन करुन अक्षयतृतीयेच्या मुहर्तावर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी “वारकरी भवन आणि महिला उद्योग भवनाच्या” उभारणीसाठी निधी कमी पडून देणार नसल्याचा शब्द सर्व पक्षीय नेत्यांनी वारकऱ्यांना दिला.

    यावेळी आमदार विश्वनाथ भोईर, माजी आमदार नरेंद्र पवार, शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील, माजी नगरसेवक सुनील वायले, अर्जुन भोईर, भाजपा महिला शहर अध्यक्ष वैशाली पाटील, समाजसेवक भारत मिरकुटे, मनसे शाखा प्रमुख गणेश लांडगे, उद्योजक दिपक भंडारी, कृष्ण कारभारी, विकासक योगेश परदेशी, ज्येष्ठ वारकरी आदी मान्यवर उपस्थित होते.

    कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सभागृहाने दिनांक २०/११/२०१३ रोजी झालेल्या सभा क्रमांक १० मध्ये तत्कालीन नगरसेवक सुनील वायले यांच्या प्रभाग क्रमांक २ गंधारे येथील माधव संकल्प या इमारतीच्या बाजूला १२८४ चौ.मीटर अशी अॅमेनिटी स्पेसच्या जागेवर वारकरी भवन आणि माहिला उद्योग केंद्र उभारण्याबाबतच्या ठरावाला मान्यता देण्यात आली. या मागणीचा विचार करून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने दिनांक २०/११/२०१३ रोजी केलेल्या ठरावाच्या दृष्टीने मौजे गंधारे माधव संकल्प इमारतीच्या बाजूला असलेला १२८४ चौ मीटर भूखंड “वारकरी भवन आणि महिला उद्योग भवनासाठी” महापालिका प्रशासनाने कल्याण शहरात वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधत्व करणाऱ्या श्री. ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय वारकरी सेवाभावी ट्रस्टला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय नुकताच घेऊन तसा भाडे करार नोंदणीकृत केला.

    यांनतर शुक्रवारी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या ट्रस्टने सकाळी ११ वाजता सदर कामाच्या नामफलकाचा अनावरण सोहळा आयोजित केला होता. यावेळी कल्याण शहरातील राजकीय, सामाजिक आणि परमार्थिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.