मुख्याध्यापकांना कारवाईचा इशारा; झेडपीचे दोन शिक्षक निलंबनाच्या रडारवर

झेडपी शाळेतील शिक्षक नेमून दिलेल्या वेळेत न येता उशीरा येऊन हजेरी लावल्याची बाब निर्देशनास आल्याने मुख्यांध्यपकांवरचं कारवाई करण्याचा इशारा सीईओ दिलीप स्वामी यांनी दिला आहे.

  सोलापूर : झेडपी शाळेतील शिक्षक नेमून दिलेल्या वेळेत न येता उशीरा येऊन हजेरी लावल्याची बाब निर्देशनास आल्याने मुख्यांध्यपकांवरचं कारवाई करण्याचा इशारा सीईओ दिलीप स्वामी यांनी दिला आहे. तर मुख्यालयसह पंचायात समिती कर्मचाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे.

  सीईओ स्वामी यांनी शुक्रवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी, तिऱ्हे, बेलाटी येथील झेडपी शाळाची पाहणी केली. यावेळी पाथरी येथील शिक्षक दुपारी १२ वाजल्यानंतर शाळेत येत असल्याचा प्रकार समोर आल्याने दोन शिक्षक निलंबनाच्या रडरावर आले आहेत. उशिरा येणाऱ्या शिक्षकावर नाही तर मुख्याध्यापकावर कारवाई करणार असल्याचे दिलीप स्वामी यांनी सांगितले.

  सोलापूर झेडपीतील शिक्षण विभागात झालेले लाचेचे प्रकरण तसेच इतर काही कारणांमुळे झेडपीतील कामाच्या पद्धतीत बदल करण्यात येणार आहे. कामानिमित्त आलेल्या व्यक्तींनी कोणत्याही कर्मचाऱ्यांना न भेटता थेट अधिकारी यांनाच भेटावे असे आदेश सीईओ दिलीप स्वामी यांनी प्रशासनाला दिले आहेत.

  शिक्षण विभागात झालेल्या लाचेच्या प्रकरणामुळे कामात पारदर्शकता, सुसूत्रता यावी यासाठी काही निर्णय घेण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या कार्यालयात खासगी व्यक्तींना प्रवेश रोखण्यात येणार आहे. ज्या व्यक्तीचे काम आहे, त्यांनी संबंधित खातेप्रमुखांनाच भेटावे, सीईओ यांनी कर्मचाऱ्याना खासगी व्यक्तीस भेटण्यास मनाई केली आहे.

  झेडपी शिक्षकांनी कर्तव्यात कसूर करत असल्याची बाब सीईओंच्या निर्देशनास आल्यास थेट निलंबन करण्याचा अधिकार त्यांना आहे. पाथरी,तिऱ्हे,बेलाटी,येथील शाळेतील शिक्षकांची माहीती मागविली आहे.

  संजय जावीर (प्राथमिक शिक्षणाधिकारी)