राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईकरांनो आरोग्य सांभाळा

मुंबईत काही दिवसांपासून अतिशय उष्ण, दमट हवामान होते. रात्री पाऊस झाल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, येत्या २ ते ३ दिवसात मुंबईत आणखी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशानाकडून करण्यात आले आहे.

    मुंबई : राज्यात पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पूरस्थिती (Flood) ओसरली आहे. तर, मुंबईसह, ठाणे (Mumbai Rain) परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबईत पावसाने उघडीप दिल्यामुळे उष्णतेत वाढली होती. तसेच, येत्या चार दिवसांत राज्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस (Heavy Rain) होण्याची शक्यता हवामान विभागाने (Meteorology Department) वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह घाट परिसरात, काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

    मुंबईत काही दिवसांपासून अतिशय उष्ण, दमट हवामान होते. रात्री पाऊस झाल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, येत्या २ ते ३ दिवसात मुंबईत आणखी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी (Take Care Of Heath), असे आवाहन प्रशानाकडून करण्यात आले आहे.