maratha-reservation

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुनच सरसकट आरक्षण देण्यात यावे. या बाबतची प्रक्रिया सरकारने हाती घ्यावी. आरक्षण न दिल्यास मात्र बेमुदत अर्धसमाधी आंदोलन करण्याचा इशारा माढा तालुक्यातील जामगाव मधील मालोजी चव्हाण या दिव्यांग मराठा तरुणाने दिला आहे.

    माढा : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुनच सरसकट आरक्षण देण्यात यावे. या बाबतची प्रक्रिया सरकारने हाती घ्यावी. आरक्षण न दिल्यास मात्र बेमुदत अर्धसमाधी आंदोलन करण्याचा इशारा माढा तालुक्यातील जामगाव मधील मालोजी चव्हाण या दिव्यांग मराठा तरुणाने दिला आहे.
    चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मी दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग असुन सकल मराठा समाजाची उपजीविका ही शेतीवर अवलंबून आहे.आज शेतीमालाला भाव नसल्याने जमीनदार म्हणून समजला जाणारा मराठा समाज अल्पभूधारक शेतकरी म्हणुन गणला जात आहे. त्यामुळे समाज बांधवाना दैनंदिन गरजा भागवणे अशक्य होऊन बसले आहे. समाजाला शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये आरक्षण नसल्याने मराठा समाजातील तरुण वैफल्यग्रस्त झाले असुन आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबिसी प्रवर्गातुन आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी चव्हाण यांनी जामगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर अर्धसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. माढा तहसील कार्यालयास निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.