warning to rahul gandhi on vinayak damodar savarkar and emotional appeal to bjp leaders says uddhav thackeray nrvb

सावरकरांनी जे केले ते कोणाचेही काम नाही १४ वर्ष छळ सोसला ते बलिदानच. म्हणून राहुल गांधींना सांगतोय आपण लोकशाही वाचवायला आलोय. आता जर वेळ चुकली तर मग पुढे कठीण आहे. पुन्हा जर हे तिथे बसले की मग लोकशाही संपली. ही लढाई मी मुख्यमंत्री होण्याची नाही. लोकशाही वाचवण्याची आहे.

मालेगाव : काल राहुल गांधींची (Rahul Gandhi) पत्रकार परिषद झाली. हिडनबर्गने (Hidenburg) घोटाळे काढले (Scams) पण त्याकडे लक्ष नाही. राहुल गांधींना जाहीर सांगतो सावरकर (Vinayak Damodar Savarkar) आमचे दैवत त्यांचा अपमान आम्हाला पटणार नाही. सावरकर काय होते हे आपण वाचू शकतो. अष्टभुजेसमोर शपथ घेणारे सावरकर. १५ व्या वर्षी ही सावरकरांची शपथ. अशा थेट शब्दांत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना इशारा दिला (Uddhav Thackeray Warning To Rahul Gandhi).

सावरकरांनी जे केले ते कोणाचेही काम नाही १४ वर्ष छळ सोसला ते बलिदानच. म्हणून राहुल गांधींना सांगतोय आपण लोकशाही वाचवायला आलोय. आता जर वेळ चुकली तर मग पुढे कठीण आहे. पुन्हा जर हे तिथे बसले की मग लोकशाही संपली. ही लढाई मी मुख्यमंत्री होण्याची नाही. लोकशाही वाचवण्याची आहे. भाजप मधील सावरकर भक्त आहात तर अंध भक्त होऊ नका. असेही ठाकरे पुढे म्हणाले.

१५ दिवसांपूर्वी संजय कदम, अद्वय आले हे सभा सभारंभ पुरता असू नये. ही लढाई देशाची, शेतकऱ्यांची आहे. तुमची मला आवश्यकता आहे. श्रीकृष्णाने जसा गोवर्धन उचलला तसा लोकांनी पण हातभार लावला तसा तुम्ही पण हातभार लावा. रावण धनुष्य घेताना उताणा पडला तिथे हे मिंधे कोण? मी तुमच्या सोबतीने लढायला उभा आहे.