Washim won first place in the state in catch the rain campaign, district collector reviewed

केंद्र शासन पुरस्कृत जलशक्ती अभियानातंर्गत ‘कॅच द रेन मोहिमेचा आढावा १ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.(Collector Shanmugarajan S.) यांनी घेतला. कॅच द रेन मोहिमेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामात वाशिम जिल्ह्याने राज्यात प्रथम (Washim district first in State) क्रमांकावर बाजी मारली आहे, अशी माहिती आकोसकर यांनी यावेळी दिली.

    वाशिम  : कॅच द रेन (Catch the Rain) मोहिमेअंतर्गत चार विविध प्रकारच्या बाबीतून ११ हजार २७५  कामे आणि ५ लाख ८० हजार ८०६ वृक्षलागवडीची कामे अशी एकूण ५ लाख ९२ हजार ८१ कामे करण्यात आली आहे .कॅच द रेन मोहिमेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामात वाशिम जिल्ह्याने राज्यात प्रथम (Washim district first in State) क्रमांकावर बाजी मारली आहे, अशी माहिती आकोसकर यांनी यावेळी दिली.

    केंद्र शासन पुरस्कृत (Sponsored by Central Govt) जलशक्ती अभियानातंर्गत (Under Jalshakti Abhiyan) ‘कॅच द रेन मोहिमेचा आढावा १ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.(Collector Shanmugarajan S.) यांनी घेतला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर, लक्ष्मण मापारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वानखेडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांची प्रमुख उपस्थिती होती.

    यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन म्हणाले की, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या रिचार्ज शाफ्टच्या कामाच्या ठिकाणी नदी आणि नाल्याच्या काठावरील दोन्ही बाजुला बांबूंची लागवड करण्यात यावी. वृक्ष लागवडीसाठी सामाजिक वनीकरण विभागाने मागील वर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा वृक्ष लागवडीसाठी झाडे उपलब्ध करुन द्यावीत. विभागांनी वृक्ष लागवडीच्या कामाला सुरुवात करुन वृक्ष लागवडीसोबतच संगोपनाकडे विशेष लक्ष द्यावे. ज्या विभागांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. ते लागवडीतून पूर्ण करावे. ‘कॅच द रेन मोहिमेअंतर्गत करण्यात येणारी कामे निर्धारीत वेळेत पूर्ण करुन फोटो व कामांची माहिती संबंधित पोर्टलवर अपलोड करावी. असे त्यांनी सांगितले. सभेला सर्व गट विकास अधिकारी, सर्व नगर पालिका व नगर पचायतींचे मुख्याधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी, यंत्रणांचे प्रमुख व त्यांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.

    जलसंधारणाची कामे करण्याच्या सूचना

    जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी यावेळी सांगितले की, जिल्हा परिषदेच्या ज्या विभागांमार्फत या मोहिमेअंतर्गत कामे करण्यात येत आहे. ती कामे नियोजनबध्द पध्दतीने करुन दिलेले उद्दिष्ट यंत्रणांनी पूर्ण करावे. वृक्ष लागवडीसह, शोषखड्डे, छतावरील पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे भूगर्भात साठवणुकीची कामे यासह इतरही जलसंधारणाची कामे चांगल्या प्रकारे करण्यात यावी, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या. यावेळी संबंधित यंत्रणेमार्फत करण्यात आलेल्या आणि करण्यात येणाऱ्या कामाची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.