Washim police seize 2 lakh 75 thousand items, file action against 9 persons

हिंगोली नाका येथे कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील रोडलगत व पाटणी चौक येथील भाजी मार्केट जवळ धाडी टाकून वरली जुगार खेळणारे व खेळविणाऱ्या ५ इसमांवार व धंदा मालक २ असे एकून ७ इसमांवर वरली जुगार कायद्यान्वये कार्यवाही करुन त्यांच्याकडून वरली जुगार साहित्य, नगदी रुपये, मोबाईल, मोटारसायकल असा एकूण १ लाख ९९ हजार ५७० रुपयांचा माल हस्तगत केला आहे.

    वाशीम : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी वाशीम अपर पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने अवैध धंद्यावर धाड टाकून कारवाई केली. अप्पर पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या विशेष पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत लसंते यांना २८ मे रोजी गोपनीय माहितीदाराकडून माहिती मिळाली की, वाशीम शहरातील काही भागात अवैधरीत्या वरली जुगार व दारुविक्री होत आहे.

    या माहितीवरून सपोनि लसंते यांनी पोलीस अधिक्षक यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनात पथकामार्फत वाशीम शहरातील पोस्ट ऑफिसचे समोरील वाशिम हिंगोली हायवे रोडचे लगत, हिंगोली नाका येथे कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील रोडलगत व पाटणी चौक येथील भाजी मार्केट जवळ धाडी टाकून वरली जुगार खेळणारे व खेळविणाऱ्या ५ इसमांवार व धंदा मालक २ असे एकून ७ इसमांवर वरली जुगार कायद्यान्वये कार्यवाही करुन त्यांच्याकडून वरली जुगार साहित्य, नगदी रुपये, मोबाईल, मोटारसायकल असा एकूण १ लाख ९९ हजार ५७० रुपयांचा माल हस्तगत केला आहे.

    त्याच प्रमाणे लक्झरी बस स्टॅन्ड भागात व हिंगोली नाका भागात अवैधरीत्या दारु विक्री करणाऱ्या दोन इसमांवर दारुबंदी कायद्यान्वये कार्यवाही करुन त्यांच्याकडून दारु साठा, नगदी व मोटार सायकल असता एकूण ७६ हजार १०० रुपयांचा माल हस्तगत केला आहे. वरली जुगार व अवैध दारु विकी करणारे अशा एकूण ९ इसमांवर वेगवेगळे ५ गुन्हे दाखल करून २ लाख ७५ हजार ६७० रुपयांचा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यता आला. ही कार्यवाही पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधिक्षक यांच्या विशेष पथक इन्चार्ज सहा. पोलीस निरीक्षक भारत लसंते व त्यांचे सोबतचे पोलीस  स्टाप राजेश निर्माण, कैलास नागरे, राजकुमार यादव, दिपक गिरी, दिपक मुळे यांनी केली.