उन्हाळ्यात पुणेकरांवर पाणी संकट, गुरुवारी ‘या’ भागांमध्ये राहणार पाणीपुरवठा बंद

भर उन्हाळ्यातच पुणेकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. पुण्यात गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

    राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली आहे.त्यातच आता पुणेकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. भर उन्हाळ्यातच पुणेकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. पुण्यात गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. विविध भागात असलेल्या जल वाहिन्यांच्या दुरुतीचे काम केले जाणार आहे. या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहील. बाणेर, बालेवाडी, कोथरूड, कात्रज आणि विमाननगर यांच्यासह इतर काही भागातील जलवाहिन्या नियोजित विद्युत दुरुस्ती पाणी कपात केले आहे. वारजे जलशुद्धीकरण केंद्र, चांदणी चौक पाण्याची टाकी, पॅनकार्ड क्लब पाण्याची टाकी आणि भामा आसखे प्रकल्प या कामांमुळे शहरातील काही भागांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. कामाचे नियोजन केल्यामुळे काही भागात पाणीटंचाई जाणवेल, असे मनपा पाणी विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले आहे.

    पुण्यातील ‘या’ भागांमध्ये पाणीपुरवठा राहणार बंद

    पाषाण, बावधन, सुस रोड, सुतारवाडी, वारजे माळवाडी, काकडे सिटी परिसर, महात्मा सोसायटी, बाणेर, बालेवाडी, करवेंगार, वारजे, कात्रज, कोंढवा, खादी मशीन चौक, लोहगाव, विमाननगर, विश्रांतवाडी, येरवडा, धानोरी, खराडी, रामटेकडी, सोलापूर रोड, कोरेगाव पार्क, फुरसुंगी आणि हडपसरचा काही भागात पाणी नसणार आहे. त्यासोबतच पाषाण, भूगाव रस्ता परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, बावधन परिसर, उजवी आणि डावी भुसारी काॅलनी, चिंतामणी सोसायटी, पाषाण, परमहंसनगर, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, सूस रस्ता, कुंभारवाडी टाकी, सिप्ला फाउंडेशन, रेणुकानगर, हिल व्ह्यू सोसायटी, पॉप्युलरनगर, पॅनकार्ड क्लब रस्ता, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडीपाॅईंट रस्ता, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्तनगर, कर्वेनगर या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

    इस्कॉन मंदिर परिसर, टिळेकर नगर, येवलेवाडी, कोंढवा गाव, खडी मशिन परिसर, लोहगाव, विमाननगर, वडगावशेरी, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, धानोरी, खराडी गावठाण, आपले घर, तुळजाभवानी नगर, थिटे वस्ती, तुकारामनगर, चंदननगर, रामटेकडी, सय्यदनगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणेनगर, काळेपडळ, मुंढवा, केशवनगर, मांजरी, शेवाळेवाडी, बीटी कवडे रस्ता, भीमनगर, कोरेगाव पार्क, साडेसतरा नळी, महंमदवाडी, हांडेवाडी, फुरसुंगी, उरुळी देवाची, खडकी, पुणे कॅन्टोन्मेंट या सर्व भागात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पाणीपुरवठा बंद ठेवल्याने नागरिकांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे.