उद्या मुंबई व उपनगरात १५ टक्के पाणीकपात, तर ‘या’ विभागात येणार नाही पाणी

गुरुवार ४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० वाजेपासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पाणी येणार नाही. दरम्यान, बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे (BMC) भांडुप (Bhandup) संकुल येथील जुन्‍या महासंतुलन जलाशयापासून सुरु होणाऱ्या तानसा (Tansa) जलवाहिनीचे व बीपीटी लाईनचे (BPT line) (ब्रेक प्रेशर टनेल) व नवीन महासंतुलन जलाशयातून निघणा-या तानसा जलवाहिनीबरोबर छेद जोडणी करण्‍याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

  मुंबई : जलवाहिनी छेद जोडणी आणि झडपा बदलणे कामांमुळे संपूर्ण मुंबई शहर व उपनगरात १५ टक्के पाणीकपात होणार आहे. (15 percent water reduction in Mumbai city and suburbs) तर काही ठराविक परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. गुरुवार ४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० वाजेपासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पाणी येणार नाही. दरम्यान, बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे (BMC) भांडुप (Bhandup) संकुल येथील जुन्‍या महासंतुलन जलाशयापासून सुरु होणाऱ्या तानसा (Tansa) जलवाहिनीचे व बीपीटी लाईनचे (BPT line) (ब्रेक प्रेशर टनेल) व नवीन महासंतुलन जलाशयातून निघणा-या तानसा जलवाहिनीबरोबर छेद जोडणी करण्‍याचे काम हाती घेण्यात येणार आहे. (15 percent water reduction in Mumbai city and suburbs)

  तसेच भांडुप संकुल येथील १९१० दशलक्ष उदंचन केंद्रातील दोन १२०० मिलीमीटर व्यासाच्या स्लुईस झडपा बदलणे आणि येवई येथे नवीन तानसा जलवाहिनीवरील क्‍लोरिन इंजेक्‍शन लाईनवरील झडप बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळं पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, हे काम गुरुवार दिनांक ४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० वाजेपासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. यास्तव, सदर कालावधीत संपूर्ण मुंबई शहर व दोन्ही उपनगरात १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. तर काही ठराविक परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.

  या विभागात १५ टक्के कपात

  पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे व शहर या विभागातील संपूर्ण क्षेत्र – (पाणीपुरवठ्यामध्ये १५ टक्के कपात)

  १) एस विभागः गावदेवी टेकडी, सर्वोदय नगर – (दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

  कांजुर (पश्चिम) ते विक्रोळी स्थानकासह लालबहादूर शास्त्री मार्गालगतचा दोन्ही बाजूंचा परिसर, सुर्यानगर, चंदन नगर, विक्रोळी स्थानक मार्ग (पश्चिम) – (दुपारी १२.३० ते रात्री ११ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

  रमाबाई नगर I आणि II , दिन्शॉ पूल ते भांडुप जलाशय परिसर  – (दुपारी ४ ते सायंकाळी ७.३० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

  साई हिल, टेंभीपाडा – (रात्री ८ ते रात्री ११ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

  एँथोनी चर्च, कामराज नगर परिसर, पाटकर कंपाऊंड परिसर – (दुपारी  १ ते सायंकाळी ५ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

  महाराष्ट्र नगर, फरिद नगर, काजू टेकडी, कांबळे कंपाऊंड – (पहाटे ५ ते सकाळी १० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (कमी दाबाने पाणीपुरवठा होईल).

  खिंडीपाडा, श्रीरामपाडा, राजारामवाडी – (पहाटे ५ ते सायंकाळी ५ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (सकाळी १० ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील).

  रामनगर, तानाजीवाडी – (सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (सकाळी १० ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील).

  सर्वोदय नगर, गावदेवी टेकडी व गावदेवी मार्ग – (दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

  रमाबाई आंबेडकर नगर, टेंभीपाडा, नरदास नगर, शिवाजी नगर, साई हिल, साई विहार – (दुपारी ४ ते रात्री ११ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

  नरदास नगर, शिवाजी नगर – (२४ तास पाणीपुरवठा) – (सकाळी १० ते मध्यरात्री १२ वाजता पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

  कांजूर (पश्चिम), विक्रोळी (पश्चिम), सुर्यानगर, विक्रोळी स्थानक लगतचा परिसर – (दुपारी १ ते रात्री ११ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

  आरे रोड, मोरारजी नगर, गौतम नगर, जयभीम नगर, फिल्टर पाडा, पठाणवाडी – (२४ तास पाणीपुरवठा) – (सकाळी १० ते मध्यरात्री १२ वाजता पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

  २) एन विभागः कैलाश संकुल पंपिग स्टेशन येथून होणारा पुरवठा – वीर सावरकर मार्गालगतचा परिसर, विक्रोळी (पश्चिम) – (दुपारी १२ ते दुपारी १ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

  विक्रोळी गाव, गोदरेज रुग्णालय विक्रोळी (पूर्व) –

  (दुपारी १२.३० ते रात्री ११ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील). काम पूर्ण झाल्यानंतर *मध्यरात्री २.३० ते सकाळी ११ वाजेपर्यंतचा पाणीपुरवठा विक्रोळी (पूर्व) आऊटलेटने नियंत्रित करण्यात येईल.

  विक्रोळी स्थानक मार्ग, विक्रोळी स्थानक ते श्रेयस सिनेमा जंक्शन  लालबहादूर शास्त्री मार्गाच्या दोन्ही बाजूंचा परिसर – (सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

  गोदरेज कंपनी, रेल्वे लाईनची पश्चिम बाजूचा परिसर – (दुपारी २.३० ते रात्री ११ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

  सर्वोदय नगर क्षेत्र – सर्वोदय रुग्णालय ते श्रेयस सिनेमा जंक्शन लालबहादूर शास्त्री मार्गाच्या दोन्ही बाजूंचा परिसर – (सायंकाळी ६ ते रात्री १०.३० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (कमी दाबाने पाणीपुरवठा होईल).

  ३) एल विभागः कुर्ला उत्तर क्षेत्र-

  बरेली मस्जिद, ९०’०” रोड, कुर्ला-अंधेरी मार्ग, जरीमरी, घाटकोपर-अंधेरी लिंक मार्ग, सावरकर नगर, महात्मा फुले नगर, तानाजी नगर,साकी विहार मार्ग, मारवा उद्योग मार्ग भाग, सत्य नगर पाईपलाईन – (सकाळी ६ ते दुपारी १.३० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठयामध्ये १५ टक्के कपात व उंचावरील भागास कमी दाबाने पाणीपुरवठा होईल).

  कुर्ला दक्षिण क्षेत्र-

  काजूपाडा, सुंदरबाग, नवपाडा, कोहिनूर सिटी, प्रीमियर कॉलनी, बैलबाजार, वाडिया इस्टेट, ख्रिश्चन गांव, संदेश नगर, शास्त्रीनगर, हलावपूल, न्यू मिल मार्ग, ब्राम्हणवाडी, विनोबा भावेनगर, कपाडिया नगर, न्यू म्हाडा कॉलनी, किस्मत नगर, परिघ खाडी, तकियावार्ड, महाराष्ट्र काटा, गफुरखान इस्टेट, पाईपलाईन मार्ग, एल. बी. एस. मार्ग (पूर्व व पश्चिम) इत्यादी – (सायंकाळी ६.३० ते सकाळी ८.४५ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठयामध्ये १५ टक्के कपात व उंचावरील भागास कमी दाबाने पाणीरवठा होईल).

  ४) के/पूर्व विभागः चकाला, प्रकाशवाडी, गोविंदवाडी, मालपा डोंगरी क्रमांक १ व हनुमाननगर, मोटानगर, शिवाजीनगर, शहिद भगतसिंग वसाहत (भाग), चरतसिंग वसाहत (भाग), मुकुंद हॉस्पिटल, तांत्रिक विभाग, लेलेवाडी, इंदिरानगर, मापखान नगर, टाकपाडा, नवपाडा, विमानतळ मार्गक्षेत्र, चिमटपाडा, सागबाग, मरोळ औद्योगिक क्षेत्र, रामकृष्ण मंदिर मार्ग, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, क्रांती नगर – (दुपारी २ ते सायंकाळी ५.३० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

  सहार रोड क्षेत्र, केई-०१

  कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी ऍन्ड टी कॉलनी – (दुपारी २ ते सायंकाळी ५.३० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

  एम. आय. डी. सी. व भवानी नगर के/ई-१०

  मुलगाव डोंगरी, सुभाष नगर, एम. आय. डी. सी. मार्ग क्रमांक १ ते २३, भंगारवाडी, ट्रान्स आपर्टमेंट, कोंडीविटा, महेश्वरी नगर, उपाध्याय नगर, ठाकुर चाळ, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गापाडा, मामा गॅरेज – (सकाळी १० ते दुपारी २ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

  विजय नगर मरोळ क्षेत्र, केई-१०ए

  विजय नगर मरोळ, मिलीट्री रोड, वसंत ओआसिस, गावदेवी, मरोळ गाव, चर्च रोड, हिल व्ह्यू सोसायटी, कदमवाडी, भंडारवाडा, उत्तम ढाबा – (सायंकाळी ६ ते रात्री १० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

  सिप्झ – (२४ तास) – (सकाळी १० ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील).

  आंतरराष्ट्रीय विमानतळ – (२४ तास) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

  ५) एच/पूर्व विभागः वांद्रे टर्मिनस – (२४ तास) – (सकाळी १० ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील).

  शहरः-

  ६) जी/उत्तर विभागः धारावी सायंकाळचा पाणीपुरवठा –

  धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदीर मार्ग, ए. के. जी. नगर, दिलीप कदम मार्ग,  संत गोरा कुंभार मार्ग – (दुपारी ४ ते रात्री ९ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (सकाळी १० ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील).

  धारावी सकाळचा पाणीपुरवठा 

  प्रेम नगर, नाईक नगर,  धारावी लूप रोड – (सकाळी १० ते दुपारी १२ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

  पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे व शहर या विभागातील संपूर्ण क्षेत्र – (पाणीपुरवठ्यामध्ये १५ टक्के कपात).

  संबंधीत परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, उपरोक्त नमूद कालावधीत पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.