गुरुवारी पुण्यातील ‘या’ भागात पाणी बंद; दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा हाेणार

वारजे जलकेंद्राचे अखत्यारीतील गांधी भवन टाकी वरील कोथरूड परिसर व चांदणी चौक (चौकोनी) टाकी वरील बावधन परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाण्याच्या लाईनला फ्लो मीटर बसविण्याचे नियोजन असल्यामुळे गुरुवारी पश्चिम भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी या भागाला उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा हाेईल.

    पुणे : वारजे जलकेंद्राचे अखत्यारीतील गांधी भवन टाकी वरील कोथरूड परिसर व चांदणी चौक (चौकोनी) टाकी वरील बावधन परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाण्याच्या लाईनला फ्लो मीटर बसविण्याचे नियोजन असल्यामुळे गुरुवारी पश्चिम भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी या भागाला उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा हाेईल.

    पाणी पुरवठा बंद असणारा भाग :

    वारजे जलकेंद्र अखत्यारीतील गांधी भवन टाकीवरील कोथरूड परिसर :- महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, गणंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, कांचन गंगा, अलकनंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-1, आरोह सोसायटी, श्रावणधारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, प्रमतेश सोसायटी, डी.पी. रोड वरील भाग, वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक (चौकोनी) टाकीवरील बावधन परिसर :- बावधन, गावठाण, बावधन खुर्द, बावधन बुद्रुक, वैदेही एनक्लेव्ह सोसा., विद्यान नगर, पाषाण रोड वरील डावा, उजवा भाग.