पाणीपुरवठा बंद! येत्या गुरुवारी पुण्यातील ‘या’ भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद

पुणे शहरातील काही भागामध्ये येत्या गुरुवारी (दि.08) पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पर्वती येथील पाण्याच्या टाकीचे (एचएलआर) विद्युत, पंप व स्थापत्य विषयीची कामे असल्यामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद असणार आहे.

    पुणे : पुणे शहरातील (Pune city) काही भागामध्ये येत्या गुरुवारी (दि.08) पाणीपुरवठा बंद (Pune city water supply off) राहणार आहे. पर्वती येथील पाण्याच्या टाकीचे (एचएलआर) विद्युत, पंप व स्थापत्य विषयीची कामे असल्यामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद असणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.09) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या (Pune PMC) पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

    पुणे शहरातील सहकारनगर, गुलटेकडी परिसर, कोंढवा, पर्वती, धनकवडी, कात्रज परिसरामध्ये येत्या गुरुवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे. यामध्ये सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, बिबवेवाडी गावठाण, मुकुंदनगरचा काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर, भाग एक व दोन यांचा समावेश असणार आहे.

    त्याचबरोबर लेकटाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती, महेश सोसायटी, प्रेमनगर, आंबेडकरनगर, डायसप्लॉट, ढोलेमळा, सॅलिसबरी पार्क, गिरीधरभवन, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्‍वर नगर, साईबाबानगर, कोंढवा खुर्द (सर्व्हे क्रमांक ४२, ४६) परिसर, पर्वती टॅंकर भरणा केंद्र, पद्मावती टॅंकर भरणा केंद्र, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज, धनकवडी या परिसरामध्ये देखील गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी येणार आहे.