संगमनेरमध्ये १३ टँकरने पाणीपुरवठा; २० गावांसह ४८ वाड्या-वस्त्यांना दिले जाते पाणी

जून महिना संपण्यासाठी अवघ्या आठ दिवसांचा कालावधी बाकी असताना अद्यापही संगमनेर तालुक्यासह पठारभागात पाऊस नाही. त्यामुळे पंचायत समितीच्या माध्यमातून 20 गावांसह 48 वाड्या-वस्त्यांना 13 शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून, एकून 5 लाख 36 हजार 280 लिटर पाणी पुरवठा होत असल्याची माहिती गटविकास अधिकारी अनिल नागणे व टंचाई कक्ष प्रमुख संजय अरगडे यांनी दिली.

    संगमनेर : जून महिना संपण्यासाठी अवघ्या आठ दिवसांचा कालावधी बाकी असताना अद्यापही संगमनेर तालुक्यासह पठारभागात पाऊस नाही. त्यामुळे पंचायत समितीच्या माध्यमातून 20 गावांसह 48 वाड्या-वस्त्यांना 13 शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून, एकून 5 लाख 36 हजार 280 लिटर पाणी पुरवठा होत असल्याची माहिती गटविकास अधिकारी अनिल नागणे व टंचाई कक्ष प्रमुख संजय अरगडे यांनी दिली.

    अद्याप पाऊस न आल्याने नागरिक चिंतेत

    संगमनेर तालुक्यातील पिंपळे, खरशिंदे, चिंचोली गुरव, निमोण, पोखरी बाळेश्वर, पानोडी, पिंपळगाव देपा, वरवंडी, कुंभारवाडी, सावरगाव घुले, डोळासणे, सायखिंडी, दरेवाडी, चासची गोडेवाडी, कौठे मलकापूर, पळसखेडे, कर्जुल पठार, गुजांळवाडी पठार, खांबे, नांदुरी दुमाला, अकलापूरची पत्र्याचीवाडी ही 20 गावे टंचाईग्रत्त असून त्यांच्या 12 गावठाणांसह 48 वाड्या-वस्त्यांना 26 हजार 814 लोकसंख्येला 5 लाख 36 हजार 280 लिटर पाणी पुरवठा तेरा शासकीय टँकरद्वारे सुरू आहे. त्याचबरोबर औरंगपूर, माळेगाव पठार व कौठे मलकापूर या तिन्ही गावांच्या गावठाणांना टँकर न देता तेथील बोअरवेल, विहिरी ताब्यात घेवून त्याद्वारे पाणी दिले जात आहे. मात्र, जून महिना संपत आला तरी अद्यापही पाऊस नसल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.