Why not solve the water problem? Attempting to commit suicide by pouring diesel on his body

पवई उच्चस्तर जलाशयाच्या १२०० मिलीमीटर आगम वाहिनीवरील ३०० मिलीमीटर बायपास जल वाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम, तसेच वेरावली जलाशय १ व २ साठी १८०० मिलीमीटर व्यासाची नवीन आगम वाहिनीच्या (इनलेट) जोडणीसाठी दोन १८०० मिलीमीटर X १८०० मिलीमीटर जोडकाम मंगळवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपासून बुधवार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे.

  मुंबई : तुम्ही जर पाणी (Water) अधिक वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईत २९ नोव्हेंबर रोजी काही भागात पाणीपुरवठा (Water Supply) विषयक दुरुस्तीमुळे १२ विभागांमध्ये दिनांक २९ नोव्हेंबर २०२२ रोजी  सकाळी ८.३० पर्यंत पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळं मुंबईकरांनो पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेनं (BMC) केलं आहे. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे पवई उच्चस्तर जलाशयाच्या १२०० मिलीमीटर आगम वाहिनीवरील ३०० मिलीमीटर बायपास जल वाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम, तसेच वेरावली जलाशय १ व २ साठी १८०० मिलीमीटर व्यासाची नवीन आगम वाहिनीच्या (इनलेट) जोडणीसाठी दोन १८०० मिलीमीटर X १८०० मिलीमीटर जोडकाम मंगळवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपासून बुधवार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे.

  या कालावधीत म्हणजेच मंगळवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपासून बुधवार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत के/पूर्व, एच/पूर्व, एच/पश्चिम, पी/दक्षिण, एस, एल आणि एन या विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा खंडित राहील. तसेच के/पश्चिम विभागातील परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित (बंद) राहील. के/पूर्व, जी/उत्तर, पी/दक्षिण विभागातील काही परिसरात दिनांक २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपासून दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. एच/पश्चिम विभागातील काही परिसरात दिनांक २९ नोव्हेंबर २०२२ रोजी पाणीपुरवठा कमी कालावधीसाठी होईल व काही परिसरात दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

  के/पूर्व, के/पश्चिम, पी/दक्षिण, एच/पूर्व, एच/पश्चिम, एस व एन या विभागातील पाणीपुरवठा खंडित होणारा परिसर व पी/दक्षिण, के/पूर्व, जी/उत्तर व एच/पश्चिम या विभागातील पाणीपुरवठा कमी दाबाने करण्यात येणारा तसेच एच/पश्चिम विभागातील कमी कालावधीसाठी पाणीपुरवठ्याचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे आहे.

  १) एल विभागः घाटकोपर उच्चस्तर जलाशय – अशोक नगर, संजय नगर, सांता नगर, साने गुरुजी नगर, हिमालय सोसायटी, मिलिंद नगर, आंबेडकर नगर, सुंदर नगर, असल्फा, यादव नगर, साकीनाका पोस्ट ऑफिस, दुर्गामाता मंदीर मार्ग, जंगलेश्वर महादेव मंदीर मार्ग, लोयलका, भानुशाली वाडी, कुलकर्णी वाडी, चर्च गल्ली, संघर्ष नगर – (सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (दि. २९.११.२०२२ रोजी सकाळी ८.३० ते दिनांक ३०.११.२०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित राहील).

  २) एन विभागः घाटकोपर उच्चस्तर जलाशय – राम नगर, हनुमान नगर, राहुल नगर, कैलास नगर, संजय गांधी नगर, शंकर मंदीर, जय मल्हार नगर, शिवाजी नगर, आंबेडकर नगर, निरंकारी सोसायटी, वर्षा नगर, ए व बी कॉलनीचा काही परिसर, डी व सी म्युनिसिपल कॉलनी, रायगड विभाग, आनंदगड, यशवंत नगर, गावदेवी, पठाण चाळ, अमृत नगर, इंदिरा नगर १ व २, अमिनाबाई चाळ, गणेश मैदान, मौलाना कंपाऊंड, हरिपाडा, जगदुषा नगर, कठोडीपाडा, भीमानगर, अल्ताफनगर, गेल्डानगर, गोळीबार मार्ग, नवीन दयासागर, जवाहरभाई प्लॉट, सेवानगर, ओ. एन. जी. सी. कॉलनी, माझगाव डॉक कॉलनी, गंगावाडी गेट नंबर २, सिद्धार्थ नगर, आंबेडकर नगर, साईनाथ नगर, पाटीदार वाडी, रामाजी नगर, भटवाडी, बर्वेनगर, काजू टेकडी, अकबरलाला कंपाऊंड, आझादनगर, पारसी वाडी, सोनिया गांधी नगर, खाडी मशीन, गंगावाडीचा काही परिसर – (२४ तास – पाणीपुरवठा) – (दि. २९.११.२०२२ रोजी सकाळी ८.३० ते दिनांक ३०.११.२०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित राहील).

  ३) एस विभागः पवई उच्चस्तर जलाशय – गौतम नगर निम्न पातळी, जयभीम नगर, बेस्ट नगर, फिल्टरपाडा, गावदेवी, पठाणवाडी, महात्मा फुले नगर, मुरारजी नगर, आरे मार्ग, पवई – (२४ तास – पाणीपुरवठा) – (दि. २९.११.२०२२ रोजी सकाळी ८.३० ते दिनांक ३०.११.२०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित राहील).

  ४) के/पूर्व विभागः वेरावली १ जलाशय – बांद्रेकर वाडी, फ्रान्सिस वाडी, मखरानी पाडा, सुभाष मार्ग, चाचा नगर – (दुपारी १२.४५ ते २.३० – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (दि. २९.११.२०२२ रोजी पाणीपुरवठा खंडित राहील).

  ५) के/पूर्व विभागः वेरावली १ जलाशय – वांद्रे प्लॉट, हरी नगर, शिवाजी नगर,पास्कल कॉलनी, शंकर वाडी – (दुपारी १.३० ते ३.४० – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (दि. २९.११.२०२२ रोजी पाणीपुरवठा खंडित राहील).

  ६) के/पूर्व विभागः वेरावली १ जलाशय – पंप हाऊस, विजय राऊत मार्ग, पाटील वाडी, हंजर नगर, झगडा पाडा, पारसी कॉलनी, जिजामाता मार्ग, गुंदवली हिल, आशीर्वाद चाळ, गुंदवली आझाद मार्ग, सर्वोदय नगर – (सायंकाळी ५.०० ते रात्री ९.३० – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (दि. २९.११.२०२२ रोजी पाणीपुरवठा खंडित राहील).

  ७) के/पूर्व विभागः वेरावली २ जलाशय – विशाल हॉल, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकर वाडी, बिमा नगर, पंथकीबाग, तेली गल्ली, हाजी जुमान चाळ, कोळडोंगरी, जीवा महाले मार्ग, साईवाडी, जीवनविकास केंद्र, शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान नगर, श्रद्धानंद मार्ग, नेहरू मार्ग, तेजपाल मार्ग, शास्त्री नगर, आंबेडकर नगर, काजूवाडी, चकाला गावठाण, डोमेस्टीक एअरपोर्ट, विलेपार्लेचा बहुतांश भाग – (सायंकाळी ५.०० ते रात्री ८.०० – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (दि. २९.११.२०२२ रोजी पाणीपुरवठा खंडित राहील).

  ८) पी/दक्षिण विभागः वेरावली १ जलाशय – बिंबीसार नगर – (सायंकाळी ६.०० ते रात्री ९.३० – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (दि. २९.११.२०२२ रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा येईल).

  ९) पी/दक्षिण विभागः वेरावली १ जलाशय – राम मंदीर, गोरेगाव पश्चिम – (सायंकाळी ७.३० ते रात्री ९.३० – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (दि. २९.११.२०२२ रोजी पाणीपुरवठा खंडित राहील).

  १०) के/पूर्व विभागः वेरावली १ जलाशय – ओल्ड नागरदास मार्ग, मोगरपाडा, न्यू नागरदास मार्ग, पारसी पंचायत मार्ग, आर. के. सिंग मार्ग, निकोलस वाडी परिसर अंबावाडी, गुंदवली परिसर – (रात्री ८.०० ते रात्री १०.३० – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (दि. २९.११.२०२२ रोजी पाणीपुरवठा खंडित राहील).

  ११) के/पूर्व विभागः वेरावली १ जलाशय – शिव टेकडी, दत्त टेकडी, मजासगाव टेकडी, आनंद नगर, समर्थ नगर, स्मशान टेकडी, अग्रवाल नगर, श्याम नगर, मेघवाडी, नटवर नगर, रोहिदास नगर, गांधी नगर, सरस्वती बाग, जोगेश्वरी स्थानक मार्ग, नवलकर वाडी, एच. एफ. सोसायटी मार्ग, साईवाडी, मोगरापाडा, इंदिरा नगर – (पहाटे ३.५० ते सकाळी ६.२५ – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (दिनांक ३०.११.२०२२ रोजी पाणीपुरवठा खंडित राहील).

  १२) के/पूर्व विभागः वेरावली २ जलाशय – महाकाली मार्ग, पेपरबाक्स, मालपा डोंगरी क्रमांक ३, शेर-ए-पंजाब, बिंद्रा संकुल, हंजर नगर, गणेश नगर, शोभना परिसर, पूनम नगर, गोनी नगर, पी. एम. जी. पी. कॉलनी, कोकण नगर, संजय नगर – (पहाटे ४.३० ते सकाळी ७.५० – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (दिनांक ३०.११.२०२२ रोजी पाणीपुरवठा खंडित राहील).

  १३) के/पूर्व विभागः पवई उच्चस्तर जलाशय – चकाला, प्रकाश वाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी क्रमांक १ व २, शिवाजी नगर, ए. के. मार्ग, तांत्रिक विभाग, लेलेवाडी, मरोळ-मरोशी मार्ग, टाकपाडा, विमानतळ मार्ग क्षेत्र, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, कांतीनगर, कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी ऍन्ड टी कॉलनी – (दुपारी २.०० ते सायंकाळी ५.३० – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (दि. २९.११.२०२२ रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने राहील / खंडित राहील).

  १४) के/पूर्व विभागः पवई उच्चस्तर जलाशय – मुलगाव डोंगरी, सुभाष नगर, एम. आय. डी. सी. मार्ग क्रमांक १ ते २३, ट्रान्स अपार्टमेंट, कोंडीविटा, उपाध्याय नगर, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गापाडा – (सकाळी ११.०० ते दुपारी २.०० – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (दि. २९.११.२०२२ रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने राहील / खंडित राहील).

  १५) के/पूर्व विभागः पवई उच्चस्तर जलाशय – विजय नगर मरोळ, मिलीट्री मार्ग, मरोळ-मरोशी मार्ग, गावदेवी, मरोळ गाव, चर्च मार्ग, कदम वाडी, भंडारवाडा – (सायंकाळी ६.०० ते रात्री ९.३० – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (दि. २९.११.२०२२ रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने राहील).

  १६) के/पूर्व विभागः पवई उच्चस्तर जलाशय – सीप्झ, आंतरराष्ट्रीय विमानतळ – (२४ तास पाणीपुरवठा) – (दि. २९.११.२०२२ रोजी सकाळी ८.३० ते दिनांक ३०.११.२०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा कमी दाबाने राहील).

  १७) एच/पूर्व विभागः वेरावली ३ जलाशय – टीपीएस III, टीपीएसV, आगरीपाडा, सेवा नगर, हनुमान टेकडी, ७ वा रस्ता, खार सबवे, डवरी नगर, शिवाजी नगर, गावदेवी, वाकोला पाईप लाईन मार्ग, नेहरु मार्ग – (पहाटे ४.०० ते सकाळी ७.३० – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (दिनांक ३०.११.२०२२ रोजी पाणीपुरवठा खंडित राहील).

  १८) एच/पश्चिम विभागः वेरावली ३ जलाशय – सांताक्रुझ (पश्चिम), गजधरबंध, खार पश्चिमचा पश्चिम रेल्वे व डॉ. आंबेडकर मार्ग मधील काही परिसर – (पहाटे ४.३० ते सकाळी ९.०० – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (दि. २९.११.२०२२ रोजी पहाटे ४.३० ते सकाळी ८.३० व दिनांक ३०.११.२०२२ रोजी पाणीपुरवठा खंडित राहील).

  १९) एच/पश्चिम विभागः वेरावली ३ जलाशय – वांद्रे (पश्चिम) – (पहाटे ४.३० ते सकाळी ९.०० – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (दि. २९.११.२०२२ रोजी पहाटे ४.३० ते सकाळी ८.३० व दिनांक ३०.११.२०२२ रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने राहील).

  २०) के/पश्चिम विभागः वेरावली १ + २ + ३ जलाशय – पूर्ण के/पश्चिम विभाग – (दि. २९.११.२०२२ रोजी सकाळी ८.३० ते दिनांक ३०.११.२०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित राहील).

  २१) जी/उत्तर विभागः पवई उच्चस्तर जलाशय – धारावी पाणीपुरवठा क्षेत्र (सकाळी) – (पहाटे ४.०० ते दुपारी १२.०० – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (दि. २९.११.२०२२ रोजी सकाळी ८.३० ते दिनांक ३०.११.२०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा कमी दाबाने राहील).

  २२) जी/उत्तर विभागः पवई उच्चस्तर जलाशय – धारावी पाणीपुरावठा क्षेत्र (सायंकाळी) – (पहाटे ४.०० ते रात्री ९.०० – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (दि. २९.११.२०२२ रोजी सकाळी ८.३० ते दिनांक ३०.११.२०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा कमी दाबाने राहील).

  संबंधित परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, उपरोक्त नमूद कालावधीत पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.