मराठा आंदोलकांचं स्वागत आहे, मात्र… ; मुंबईत येण्यापूर्वी राजू पाटलांचा मनोज जरांगेंना सल्ला

मनोज जरांगे यांचं मुंबईत स्वागतच आहे. मात्र, आरक्षणासाठी आंदोलन करताना वातावरण खराब होऊ नये, आपण या राज्याचे सुपुत्र आहोत, याचं भान ठेवूनच सर्वांनी आंदोलन करावं, असा सल्ला मनसे आमदार राजू पाटील यांनी मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलकांना दिला आहे.

    मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी निर्णायक लढा पुकारला आहे. आझाद मैदानावर आमरण उपोषणाची घोषणा मनोज जरांगे-पाटील यांनी केली होती. यासाठी अंतरवाली सराटीतून पायी मुंबईकडे प्रस्थान करण्यात येणार आहे. यासाठीचा मार्ग मनोज जरांगे-पाटील यांनी जाहीर केला आहे. दरम्यान, मुंबईत दाखल होण्याआधी मनसेने जरांगे यांना मोलाचा सल्ला दिला आहे.

    मनोज जरांगे यांचं मुंबईत स्वागतच आहे. मात्र, आरक्षणासाठी आंदोलन करताना वातावरण खराब होऊ नये, आपण या राज्याचे सुपुत्र आहोत, याचं भान ठेवूनच सर्वांनी आंदोलन करावं, असा सल्ला मनसे आमदार राजू पाटील यांनी मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलकांना दिला आहे.

    मराठा आरक्षणाचा विषय इतका सोपा नाही. पहिले सरकार बरं-बरं बोलत होतं. आता खरं खरं बोलत आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला इम्पेरिकल डाटा जमा करणे आवश्यक आहे. त्यासाठी मागासवर्गीय आयोगाकडून संख्या घ्यावी लागेल, असं राजू पाटील म्हणाले.

    राज्य सरकारने जेव्हा जरांगे पाटील यांची भेट घेतली, सर्व गोष्टी क्लियर करायला हव्या होत्या. अजूनही सरकारने स्पष्ट बोलायला सुरुवात केली पाहिजे. तेव्हा जरांगे यांना समजून सांगितलं असतं तर ही वेळ आली नसती. सरकारने ज्या मुठी झाकून ठेवल्या आहेत, त्यामुळे ही वेळ आली आहे, असं म्हणत राजू पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

    मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा अजिबात विरोध नाही. मुंबईत त्यांचं स्वागतच आहे. मात्र आरक्षणासाठी आंदोलन करताना वातावरण खराब होऊ नये, आपण या राज्याचे सुपुत्र आहोत याच भान ठेवूनच सर्वांनी आंदोलन करावं, असा सल्ला देखील राजू पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे.