विशाल पाटलांबाबत संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले, ‘अर्ज भरला म्हणजे…’

सांगली लोकसभा जागेसाठी (Sangli Lok Sabha Election) महाविकास आघाडीत मतभेद असल्याचे उघड झाले आहे. त्यात महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाकडून पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.

    सांगली : सांगली लोकसभा जागेसाठी (Sangli Lok Sabha Election) महाविकास आघाडीत मतभेद असल्याचे उघड झाले आहे. त्यात महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाकडून पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, काँग्रेस या जागेसाठी आग्रही आहे. त्यावरूनच वाद असताना आता संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.

    ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे सध्या सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना विशाल पाटील यांच्या उमेदवारीबाबत भाष्य केलं. ते म्हणाले, ‘विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज जरी भरला असेल पण तो अर्ज भरला म्हणजे बंडखोरी नाही. विशाल पाटील हे आमच्या कुटुंबातीलच आहेत. आम्ही सगळे एकत्रच आहोत. अर्ज केला म्हणजे बंड केला असं नाही’.

    दरम्यान, सध्या राज्यात 5 जागांसाठी मतदान होत आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘पूर्व विदर्भात सर्व जागांवर आमचा विजय होणार आहे. महाविकास आघाडीची जादू सर्वांना दिसेल.