कल्याणच्या हितासाठी आणि विकासासाठी आम्ही सदैव कटीबद्ध – माजी आमदार नरेंद्र पवार

कल्याण पश्चिमेतील विविध प्रभागात माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या प्रयत्नाने 2 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमीपूजन नुकतेच संपन्न झाले. त्यावेळी पवार यांनी ही भावना व्यक्त केली.

    कल्याण शहराचा सर्वांगीण विकास हेच आपले कायम उद्दिष्ट राहिले असून कल्याणच्या हितासाठी आणि विकासासाठी आपण सदैव कटिबध्द आहे. प्रतिपादन माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले. कल्याण पश्चिमेतील विविध प्रभागात माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या प्रयत्नाने 2 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमीपूजन नुकतेच संपन्न झाले. त्यावेळी पवार यांनी ही भावना व्यक्त केली.

    कल्याण शहराने आणि इथल्या नागरिकांनी नेहमीच आपल्याला भरभरून प्रेम दिले आहे. त्याची तुलना कशाशीही केली जाऊ शकत नाही की त्याची परतफेड आपण करू शकत नाही. त्यामुळेच या शहराच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी आपण पद असले नसले तरीही काम करतच आहेत आणि यापुढेही आपले हे काम असेच कायम राहील असा विश्वासही नरेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

    दरम्यान यावेळी कोकण मर्चंट बँक ते गुप्ते चौकपर्यंत, पारनाका ते शंकर मंदिर, गांधी चौक पर्यंत, बोरगांवकर बंगला ते श्री संत राम मारूती चौक पर्यंत, श्री महालक्ष्मी मंदिर ते श्री दत्त मंदिरपर्यंत, गांधी चौक रस्ता ते भिडे गल्लीपर्यंत आणि निर्मला पोळी भाजी केंद्र ते नमस्कार मंडळापर्यंत अशा 2 कोटी रुपयांच्या सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भूमीपूजन करण्यात आले.

    यावेळी कारसेवक प्रसादजी जोग, बापू कोतवाल काका, ऍड.सुरेश पटवर्धन, रामभाऊ अभ्यंणकर, प्रकाश लेले, दिनेश सोमाणी, अरुणजी फणसे, अरुणजी लेले, किरणजी देवधर, जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे, मोहोने टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर, प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस निखील चव्हाण, विधानसभा संयोजक अर्जुन म्हात्रे, मा. नगरसेवक दया गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष अनिल चौधरी, मयुरेश आगलावे, पुष्कर उपासणी, निलेश अहिरे, रवी पवार, नितीन जोशी, समीर पटेल, महेश केळकर, सुधीर जोशी, लता पालवे, योगेश डेरवणकर, श्रीधर देवस्थळी, किशोर खैरनार, जयश्री देशपांडे, रमेश मांडवे, कविता पटेल, निलेश ढवळे, संजू गोगटे, जयेश ठक्कर, शेखर वेसावकर, आदि मान्यवर पदाधिकारी कायकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.