‘आम्ही थेट जनतेच्या संपर्कात आहोत आणि जनता आमच्यासोबत’; आदित्य ठाकरेंचं विधान

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून विशेष तयारी केली जात आहे. त्यानुसार, प्रचारसभाही घेतल्या जात आहेत. त्यात आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

    यवतमाळ : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून विशेष तयारी केली जात आहे. त्यानुसार, प्रचारसभाही घेतल्या जात आहेत. त्यात आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ‘आम्ही थेट जनतेच्या संपर्कात आहोत आणि जनता आमच्या संपर्कात राहील’, असे ते म्हणाले.

    आदित्य ठाकरे यांनी पुढे म्हटले की, ‘आम्ही थेट जनतेच्या संपर्कात आहोत आणि जनता आमच्या संपर्कात राहील. या देशात लोकशाही संपत चालली आहे. संविधानाला मोठा धोका आहे. अशा काळात आम्ही सगळे एकत्र येऊन जे लोकशाही, संविधान संपवतात त्यांच्याविरुद्ध लढत आहोत. ज्यांना कोणाला लोकशाही संविधान वाचवायचं आहे ते आमच्यासोबत राहतील. केंद्रात आणि राज्यात भाजपच्या सरकारने मागील दहा वर्षांची काम व्हायला पाहिजे होती ती झाली नाहीत.

    कालच ‘एप्रिल फूल डे’ झाला आहे. तसेच जगात ‘एप्रिल फूल डे’ साजरा होतो, आपल्याकडे ‘अच्छे दिन’ म्हणून साजरा होतो. परिवर्तनाचे वारे सगळीकडे वाहायला सुरूवात झाली आहे. दिल्ली, बिहार, झारखंड, बंगाल, महाराष्ट्र सगळीकडे इंडिया आघाडीची बांधणी मजबूत होत असल्याचेही त्यांनी सांगितले.