आम्ही फिल्डवर जाणारे आहोत…घरात बसणारे नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.  आम्ही फिल्डवर जाणारे आहोत...घरात बसणारे नाही, अंस म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मी तासनतास बाहेर फिल्डवर असतो. मी घरातून कारभार किंवा कामं करत नाही, आम्ही फिल्डवर जाणारे आहोत...घरात बसणारे नाही, असं शिंदेंनी म्हणत उद्धव ठाकरेंवर टिका केली आहे.

    मुंबई : राज्यात सत्तांतर होऊन आता चार महिने झाले आहेत. शिंदे बंडाळी गटाने शिवसेनेतून बंड करत सुरत, गुवाहटी, गोवा नंतर मुंबईला येत भाजपासोबत सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची नियुक्ती झाली तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पदभार स्विकारला. दरम्यान, यानंतर ठाकरे गटाला सोडून जात शिंदे गटात सामील होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. शिंदे गट व भाजपा विरुद्ध ठाकरे गट असे अनेकदा आमनेसामने आले आहेत, या दोन गटात राडे झाले आहेत. महाविकास आघाडी ही बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात होती, असं बंड केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. त्यामुळं शिंदे गट व ठाकरे गट (Thackeray Group) असा संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे.

    दरम्यान, बंड केल्यानंतर सुरुवातील पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (udhav Thackeray) टिका केली जात नव्हती किंवा ते आमचे आजही आदरणीय आहेत, असं वारंवार शिंदे गटाकडून सांगण्यात येत होतं. मात्र आता थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला जात आहे, दरम्यान, कोविडकाळात फेसबुक लाईव्ह करत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधत तसेच त्यांना त्यावेळी घरातून कारभार चालवला होता. त्यावेळी विरोधकांनी मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत, अशी टिका केली होती.

    मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.  आम्ही फिल्डवर जाणारे आहोत…घरात बसणारे नाही, अंस म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मी तासनतास बाहेर फिल्डवर असतो. मी घरातून कारभार किंवा कामं करत नाही, आम्ही फिल्डवर जाणारे आहोत…घरात बसणारे नाही, असं शिंदेंनी म्हणत उद्धव ठाकरेंवर टिका केली आहे.