मुख्यमंत्र्यांनी मागील अडीच वर्षातील सरकारचे घोटाळे, भ्रष्टाचार यावर बोलावे, आम्ही या सर्व उत्तराची वाट पाहतोय – मोहित कंबोज

जेव्हापासून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आहे, तेव्हापासून राज्यात घोटाळे, भ्रष्टाचार, पोलीस बदल्यातील घोटाळा, माजी गृहमंत्री अनिल देशमुख 100 कोटी घोटाळा, सुशांतसिंग राजपूत आत्महत्येचे गूढ, अभिनेत्री कंगना राणावत हिच्या घरावर केलेली कारवाई, मुख्यमंत्र्यांचा हनुमान चालीसाला विरोध, राणा दाम्पंत्याना केलेली अडवणूक आदी विषयांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावी अशी मागणी मोहित कंबोज यांनी एक सोशल मीडियावर व्हीडिओ शेअर करत केली आहे.

    मुंबईः राज्यात मागील काही दिवसांपासून अजान, भोंगे, मशिद, हनुमान चालीस, आरती यावर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. हनुमान चालीसा व भोंग्यावरुन विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला व खासकरुन मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्ष्य केले आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी मागील आठवड्यात एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते की, आपण 14 तारखेच्या सभेच अनेकांचे मास्क काढणार आहोत, असं म्हणत त्यांनी विरोधकांना एका प्रकारे इशारा दिला होता. त्यामुळं मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजच्या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या “खऱ्या हिंदुत्वासाठी यायलाच पाहिजे” असे मुंबईत अनेक ठिकाणी मोठमोठे बॅनर लावण्यात आले आहेत. तसेच सभेचे तीन व्हीडिओ टिझर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आले आहेत. सभेपूर्वी शिवसनेने चांगलेत वातावरणनिर्मिती केली आहे. मात्र शिवसेनेच्या आजच्या सभेवर विरोधकांकडून टिका होत आहे.

    दरम्यान, आता शिवसेनेच्या सभेवर विरोधकांकडून टिका होत आहे. नारायण राणेंच्या टिकेनंतर आता मोहित कंबोज यांनी सुद्धा मुख्यमंत्री व राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री साहेब मागील खूप दिवसांपासून आज जनतेच्या समोर येत आहेत. त्यामुळं त्यांना ऐकण्यास आपण सर्वंच उत्सुक आहोत. मागील अडीज वर्षात महाविकास आघाडी सरकारने अनेक पराक्रम केले आहेत, त्याची उत्तरे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी द्यावी अशी मागणी मोहित कंबोज यांनी केली आहे.