डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्ही आहोत; सीईओ मनिषा आव्हाळे यांचं विधान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आम्ही आहोत. सामाजिक न्याय देण्यासाठी अहोरात्र परिश्रम केले. बाबासाहेब यांचे विचार आत्मसात करा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले.

  सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आम्ही आहोत. सामाजिक न्याय देण्यासाठी अहोरात्र परिश्रम केले. बाबासाहेब यांचे विचार आत्मसात करा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती समारंभा प्रसंगी आव्हाळे बोलत होत्या.

  १० एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात समता पंधरवाड्याचे आयोजन
  करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद कास्ट्राईब कर्मचारी संघटना, मराठा सेवा संघ यांचे संयुक्त विद्यमाने या व्याख्यान आणि भीमगीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमप्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी अभिवादन केले.

  व्याख्याते डॉ. रविंद्र चिंचोळकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी शेख, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता पारसे, कास्ट्राईब अध्यक्ष अरूण क्षिरसागर, मराठा सेवा संघ अध्यक्ष अविनाश गोडसे, लिपीकवर्गीय संघटनेचे राजेश देशपांडे, युनियनचे विवेक लिंगराज, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव प्रमुख उपस्थित होती.

  बाबासाहेब आंबेडकर यांनी गरिबांच्या विकासासाठी काम केले, असे सांगून सीईओ मनिषा आव्हाळे पुढे म्हणाल्या, माझे स्पर्धा परीक्षांचा पाया हा बाबासाहेबांचा विचाराचा आहे. या महामानवांपुढे आपले काम खुप छोटे आहे. बाबासाहेब यांचे वाचन व लेखन खूप होते. त्यांच्या विचाराचे पुढे आपण खुप नगन्य आहोत. अनेक पुस्तकांचे मी वाचन केले. बाबासाहेब यांचे फोटोला हार घालून अभिवादन करण्याबरोबरच त्यांचे विचार देखील आत्मसात करा.

  जिल्हा परिषद विकासाचे केंद्र आहे. आपणास दिलेले अधिकार शेवटच्या घटकासाठी वापरणे आवश्यक आहे, असेही सीईओ आव्हाळे यांनी सांगून आपला जीवनपट सांगून कवी नामदेव ढसाळ यांचे प्रेरणादायी कविता ऐकवली.

  प्रास्तविक समाज कल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी केले. आर्थिक शोषणाची भुमिका प्राब्लेम ऑफ रूपीजमध्ये मांडली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेस उपकर लागू करणेची भूमिका शोधनिबंधात मांडली.

  या प्रसंगी बोलताना व्याख्याते डॉ. रविंद्र चिंचोळकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला जागृत करण्यासाठी मूकनायक हे वृत्तपत्र काढले. त्यांचा हरिजन या शब्दास विरोध होता. बहिष्कृत समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र काढले. त्यानंतर स्वातंत्र्याचा लढा ही सर्वांनी घेऊन लढावे लागेल म्हणून त्यांनी जनता हे वृत्तपत्र काढले. जगातील सर्व राज्य घटनांचा अभ्यास करून भारताची लिखित स्वरूपात राज्यघटना आहे. संकुचित विचार बाबासाहेबांनी कधी केला नाही. एक ही क्षेत्र असे नाही ज्याचा बाबासाहेब आंबेडकरांचा संबंध आला नाही.

  पूरनियंत्रणाच्या बाबतीत पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यांनी नदीजोड प्रकल्प मांडला. असेही व्याख्याते डॉ. रविंद्र चिंचोळकर यांनी व्यक्त केले. परिवर्तनाचे काम बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. परिवर्तनाचे स्वप्न त्यांनी पाहिले. असेही चिचोळकर यांनी सांगितले. समाज कल्याण विभागाचे विस्तार अधिकारी स्वाती गायकवाड, विस्तार अधिकारी संदिप खरबस, सच्चीदानंद बांगर, सहाय्यक लेखाधिकारी सावळा काळे, यांनी परिश्रम घेतले.

  स्वानंद म्युझिकल ग्रुपने भीमगीत गायन केले. मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषद सोलापूर चा वतीने भीम गिताचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी सचिन चव्हाण, दिनेश बनसोडे, यांच्यासह मान्यवरांना पुस्तक भेट देणेत आले. कास्ट्राईब संघटनेचे वतीने मिठाईचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी गुरव यांनी केले.