eknath shinde and uddhav thackeray

 एकनाथ शिंदे यांच्यासह 12 बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करा अशा आशयाचे पत्र शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्षांना देण्यात आलं आहे. यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

    मुंबई : शिवसेना विरोधात आता बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काहीशी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या १२ आमदारांच सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणारे पत्र शिवसेनेन विधानसभा उपाध्यक्षांना दिले आहे. या पत्राला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी ‘आम्ही तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही असा इशाराच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला दिला आहे.

    कायदा आम्हीही जाणतो, तुमच्या असल्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे. 12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आणि शिवसैनिक आहोत. कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो. घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हिप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत.

     

    सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस असलेल्या यादीतील नावं 
    1 ) एकनाथ शिंदे
    2) अब्दुल सत्तार
    3) संदीपान भुमरे
    4) प्रकाश सुर्वे
    5) तानाजी सावंत
    6) महेश शिंदे
    7) अनिल बाबर
    8) यामिनी जाधव
    9) संजय शिरसाट
    10) भरत गोगावले
    11) बालाजी किणीकर
    12) लता सोनावणे