sanjay raut and raj thackeray meeting

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात नेमक्या काय अडचणी आल्या, हे मला माहीत नाही. राज ठाकरेंना आम्ही सहकार्य केलं असतं. मात्र भाजपने त्यांच्या बाबतीत असं का करावं? यातून काही लोकांना शहाणपण आलं तर बरं होईल. कारण यामुळे महाराष्ट्रातील नेतृत्वाचं आणि महाराष्ट्राचं नुकसान होतं. आम्हाला या मुद्द्यावरून राजकारण करायचं नाही. असं संजय राऊत यांनी तिरकस भाष्य करत राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

    मुंबई : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक पक्षांनी हिंदुत्वाचा मुद्धा सध्या उचलला आहे. असे असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा नियोजित बहुचर्चित ५ जूनचा अयोध्या दौरा अखेर प्रकृतीच्या कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. मात्र भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे राज यांनी हा दौरा रद्द केल्याची टीका त्यांच्या राजकीय विरोधकांकडून करण्यात येत आहे. या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी खोचक भाष्य केलं आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात नेमक्या काय अडचणी आल्या, हे मला माहीत नाही. राज ठाकरेंना आम्ही सहकार्य केलं असतं. मात्र भाजपने त्यांच्या बाबतीत असं का करावं? यातून काही लोकांना शहाणपण आलं तर बरं होईल. कारण यामुळे महाराष्ट्रातील नेतृत्वाचं आणि महाराष्ट्राचं नुकसान होतं. आम्हाला या मुद्द्यावरून राजकारण करायचं नाही. असं संजय राऊत यांनी तिरकस भाष्य करत राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

    दरम्यान, आमचा एक मदत कक्ष आहे, कोणाला देवदर्शनाला जायचं असेल तर आम्ही मदत करतो, आम्हाला राजकारण करायचं नाही, राज ठाकरेंना आम्ही सहकार्य केलं असतं, राज ठाकरेंच्या अयोध्या रद्द दौऱ्यावरुन संजय राऊतांनी खोचक प्रतिक्रिया देत राज ठाकरेंना टोला लगावला आहे. इतर पक्षाचे ५ जून रोजी अयोध्येत काही कार्यक्रम होते. मात्र त्यांनी ते कार्यक्रम रद्द केल्याचं मला प्रसारमाध्यमांकडून समजलं आहे. त्यांना काही सहकार्य हवं असतं तर आम्ही ते केलं असतं. कारण अयोध्या आणि उत्तर प्रदेशात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळं याला आता मनसेकडून काय उत्तर येत हे पाहावे लागेल.