
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काही लोक घरात बसून राज्याचा राज्यकारभार हाकायचे. मात्र आम्ही त्यांना एक करंट दिला आणि ते ऑनलाईनवरून थेट लाईनवर आले, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काही लोक घरात बसून राज्याचा राज्यकारभार हाकायचे. मात्र आम्ही त्यांना एक करंट दिला आणि ते ऑनलाईनवरून थेट लाईनवर आले, असे एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच तुम्ही सकाळी कितीही भोंगे लावा आम्ही आमचे काम करत राहणार. आम्ही आमच्या कामातून उत्तर देणार, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. ते आज परभणी येथे राज्य सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
सर्व योजनांना केंद्र सरकारचा भक्कम पाठिंबा मिळणार- शिंदे
यावेळी बोलताना “इतर देशातील प्रमुख आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान करतात. हा तमाम देशवासीयांचा गौरव आहे. ज्यांना राजकारण करायचे आहे, त्यांना करू द्या. आपण काम करुया. आपण या राज्याचा विकास करुया. या राज्याला पुढे नेऊया. त्यासाठी आपल्याला केंद्र सरकारचे पाठबळ मिळत आहे. आपल्या योजनांना केंद्र सरकारकडून संमती मिळत आहे. समुद्रात वाया जाणारे पाणी वळवून आपल्याला मोठे प्रकल्प करायचे आहेत. या सर्व प्रकल्पांना केंद्र सरकारचा भक्कम पाठिंबा मिळणार आहे,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.
“देश आता चंद्रावर जात आहे. मात्र दुसरीकडे काही लोक घरातच बसून राज्याचा कारभार ऑनलाईन पद्धतीने करत होते. परंतु आम्ही करंट दिला. त्यांना एक झटका दिला. आम्ही त्यांना ऑनलाईनवरून थेट लाईनवर आणण्याचे काम केले आहे,” अशी खोचक टीका केली.