आम्ही नांदेडचा एक उद्योजक गमावला, बिल्डर संजय बियाणींच्या हत्येप्रकरणी मंत्री अशोक चव्हाणांनी व्यक्त केलं मत

शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर मंगळवारी सकाळी अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला होता.  रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

    नांदेड : बिल्डर संजय बियाणी (Sanjay Biyami Murder) यांची हत्या होणं ही अतिशय धक्कादायक बाब आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी ही घटना असल्याचं वक्तव्य पालकमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केलं आहे. संजय बियाणी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी आणि परिवाराचे सांत्वन करण्यासाठी निवासस्थानी आले ते होते. त्यावेळी ते बोलत होते. गुन्हेगारांना तातडीने पकडण्यासाठी आपण पोलिस अधिकाऱ्यांशी बैठक घेणार असल्याचेही  त्यांनी सांगितले.

    शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर मंगळवारी सकाळी अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला होता.  रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्याच्यांवर करण्यात आलेल्या गोळीबाराचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. यामध्ये गाडीतून बाहेर पडलेल्या बियाणींवर दोघा जणांनी गोळीबार केल्याचं दिसत आहे. या घटननेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.