महाविकास आघाडी सरकार टिकावं ही आमची भूमिका – अजित पवार

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तसेच बंडखोर आमदारांशी चर्चा करणं गरजेचं होत. निधी वाटपाबाबत कोणताही भेदभाव केला जात नाही, असं अजित पवार म्हणाले. मविआ बरखास्त होणार का या प्रश्नावर अजित पवार (Ajeet pawar pc) म्हणाले की, बंडखोर आमदारांना परत बोलावण्यासाठी संजय राऊत तसे बोलले असावे. पण राऊतांच्या वक्तव्यावर टिका करण्याचा प्रश्नच येत नाही. पुढे बोलताना पवार म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादी काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा असून, आम्ही त्यांच्या पाठीशी उभा आहोत.

    मुंबई : विधान परिषद निवडणुकीत (MLC Election 2022) मविआच्या पराभवानंतर मविआमध्ये (MVA) मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, मविआ बरखास्त होऊन सरकार कोसळणार का? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सुरतनंतर (Surat) आता जवळपास 44 आमदारांना (MLA) घेऊन गुहावटीत (Guhawati) येथे थांबले आहेत. त्यानंतर आता राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला आहे. वर्षावर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची बैठक बोलावली असून, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली आहे. (Ajeet pawar pc)

    दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तसेच बंडखोर आमदारांशी चर्चा करणं गरजेचं होत. निधी वाटपाबाबत कोणताही भेदभाव केला जात नाही, असं अजित पवार म्हणाले. मविआ बरखास्त होणार का या प्रश्नावर अजित पवार (Ajeet pawar pc) म्हणाले की, बंडखोर आमदारांना परत बोलावण्यासाठी संजय राऊत तसे बोलले असावे. पण राऊतांच्या वक्तव्यावर टिका करण्याचा प्रश्नच येत नाही. पुढे बोलताना पवार म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादी काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा असून, आम्ही त्यांच्या पाठीशी उभा आहोत. महाविकास आघाडी टिकावी यासाठी आमची भूमिका आहे. दरम्यान, अजित पवारांमुळं शिवसेना आमदारांनी बंड केला असल्याचा आरोप काँग्रेसनी अजित पवारांवर केला आहे.