उद्धव ठाकरे हेच आम्हाला मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत : विद्या चव्हाण

एकीकडे उद्धव ठाकरेंना त्यांच्यात आमदारांनी दगा दिला तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील नेत्यांनी आणि दोन्ही पक्षांनी उद्धव ठाकरेंना समर्थन दिलं आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्य समर्थानात पुढे आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला निघाल्या आहेत.

    मुंबई : विधान परिषद निवडणुकीत मविआच्या पराभवानंतर मविआमध्ये मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, मविआ बरखास्त होऊन सरकार कोसळणार का? अशी, शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे सुरतनंतर आता जवळपास 50 पेक्षा जास्त आमदारांना घेऊन गुहावटीत येथे थांबले आहेत. असा दावा त्यांनी केलाय.

    दरम्यान एकीकडे उद्धव ठाकरेंना त्यांच्यात आमदारांनी दगा दिला तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील नेत्यांनी आणि दोन्ही पक्षांनी उद्धव ठाकरेंना समर्थन दिलं आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्य समर्थानात पुढे आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला निघाल्या आहेत.

    विद्या चव्हाण नेमकं काय म्हणाल्या ?

    शिवसेना एकटी नाही काँग्रेस राष्ट्रवादी तुमच्या सोबत आहे असं म्हणत त्यांनी शिवसेनेला समर्थन दिलं आहे. तसेच उद्धव ठाकरे हेच आम्हाला मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत असंही विद्या चव्हाण म्हणाल्या आहेत. यावेळी त्यांनी भाजपलाही धारेवर धरलं आहे. हे सगळं भाजप करतंयं असा आरोप करत आम्ही भेटून उद्धव ठाकरे यांना सांगणार आहोत असंही त्या म्हणाल्या आहेत. तसेच भाजप नेत्यांचं यापुढे काहीही चालणार नाही, असंही त्या म्हणाल्या आहेत.

    दरम्यान शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात आता कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलेल्या १२ आमदारांना पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत अपात्र ठरवावं अशी मागणी करणारी याचिका शिवसेनेच्या वतीने विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या १२ समर्थक आमदारांना पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरवावं अशी मागणी करणारी याचिका शिवसेनेच्या वतीने विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आली आहे.