We will definitely implement the order regarding Marathi nameplate, but it will take some time

आम्ही या पुढाकाराचा आदर करतो, परंतु आम्हाला असे वाटते की लाखो दुकाने व आस्थापना यांना असे करण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता राज्य शासनाने दिलेल्या कालमर्यादेबाबत सखोल विचार करावयास हवा. कमी - कर्मचारी असलेल्या व्यावसायिकांसाठी याची अंमलबजावणी करण्याचे प्रमाण हे प्रचंड आहे.

    मुंबई : इंडियन हॉटेल ॲन्ड रेस्टॉरंट असोसिएशन ( आहार ), उद्योगातील सर्वोच्च संघटनेने राज्य शासनाच्या स्थानिक भाषेत नामफलक असण्याचे बाबतीत दुकाने व आस्थापना अधिनियमात सुधारणा करण्याच्या निर्णयाचे मूल्यांकन केले. त्याचे पालन करण्याचेही मान्य केले. परंतु, संघटनेने असे म्हंटले आहे की, ३१ मेची देण्यात आलेली अंतिम तारीख ही अत्यंत कमी कालावधीची आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीकरीता किमान ६ महिन्यांच्या कालावधीची विनंती केली आहे.

    या अंमलबजावणीसाठी वाढीव वेळ मागण्याच्या बाबतीत श्री शिवानंद शेट्टी आहारचे अध्यक्ष म्हणाले की, “ आम्ही या पुढाकाराचा आदर करतो, परंतु आम्हाला असे वाटते की लाखो दुकाने व आस्थापना यांना असे करण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता राज्य शासनाने दिलेल्या कालमर्यादेबाबत सखोल विचार करावयास हवा. कमी – कर्मचारी असलेल्या व्यावसायिकांसाठी याची अंमलबजावणी करण्याचे प्रमाण हे प्रचंड आहे. प्रत्येक उद्योगाने खडतर काळाचा सामना केलेला आहे. आता कोठे महामारीच्या घसरणीतून बाहेर पडत आहे. म्हणूनच, उचित प्रकारे पूर्ततेची खातरजमा करण्यासाठी आम्ही ६ महिन्यांच्या वाढीव कालावधीची अपेक्षा करीत आहोत.