Environment and Tourism Minister Aditya Thackeray on a two-day visit to Vidarbha

दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर असलेले पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचा आजचा कोकणातील दुसरा दिवस आहे. आज माध्यमांशी संवाद साधताना, आम्ही कोकणवासियांशी तसेच नाणार येथील स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करु, त्यांचे म्हणणे काय आहे हे आम्ही ऐकून घेऊ तसेच तसेच चर्चेतून मार्ग काढू. त्यांना आम्ही नाराज करणार नसल्याचं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

    सिंधुदुर्ग : मागील काही वर्षापासून नाणार प्रकल्प चांगलाच चर्चत आला आहे. यावरुन बरेच राजकारण सुद्धा रंगले आहे. दरम्यान हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नाणार प्रकल्प पुनरुज्जीवनाची आशा असल्याचे सूतोवाच केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकासमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी दिले आहेत. महाराष्ट्र सरकारचे मनपरिवर्तन होत असल्याचे दावा केला आहे. यानंतर नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दरम्यान यावर आता प्रतिक्रिया येत आहेत,  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल यावर प्रतिक्रिया दिली आहे. तर आता कोकण दौऱ्यावर असलेले पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी सुद्धा यावर आपले मत मांडले आहे.

    दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर असलेले पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचा आजचा कोकणातील दुसरा दिवस आहे. आज माध्यमांशी संवाद साधताना, आम्ही कोकणवासियांशी तसेच नाणार येथील स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करु, त्यांचे म्हणणे काय आहे हे आम्ही ऐकून घेऊ तसेच तसेच चर्चेतून मार्ग काढू. त्यांना आम्ही नाराज करणार नसल्याचं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

    काय म्हणाले राऊत?

    एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकासमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी नाणारविषयी वरील वक्तव्य व्यक्त केल्यानंतर आता यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे. नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत लाखो कोटी रुपयांचे आणि रोजगाराचे योगदान देण्याची क्षमता आहे. स्थानिकांचं मतपरिवर्तन झाल्याची माहिती माझ्याकडे नाही. प्रधान आता त्या खात्याचे मंत्री नाहीत, ते देशाचे शिक्षणमंत्री आहेत. त्यांनी शिक्षणावर अधिक बोललं पाहिजे. मी त्यांना ओळखतो, ते फार हुशार मंत्री आहेत. त्यांनी त्यांच्या काळात मतपरिवर्तनाचा प्रयत्न केला. पण तो होऊ शकला नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

    संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया यांच्या सहकार्याने कोकणच्या किनारपट्टीवर ६० लाख टन क्षमतेचा नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते, मात्र दुर्दैवाने त्याला विरोध झाला. गेली काही वर्षे विरोधामुळे तो प्रकल्प रखडला असला तरी आता महाराष्ट्र सरकारचे मनपरिवर्तन होत असल्याचे दिसत असल्याने नाणार प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाची आशा असल्याचे सूतोवाच केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकासमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी म्हटले आहे. त्यानंतर आज यावर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.