‘हम हार नही मानेंगे, आता आमची वेळ आहे,’ संजय राऊतांचे शिंदे गटाला थेट आव्हान

राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला असून, मविआमध्ये बैठकाचं (MVA meeting) सत्र सुरु आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, शिवसेना नेते अनिल देसाई आणि संजय राऊत यांची एक बैठक पार पडली. (MVA Meeting Sharad pawar, dilip walse patil, anil desai, sanjay raut) या बैठकीत राज्यात घडणाऱ्या पुढील घडामोडींबाबत चर्चा करण्यात आली तसेच, शिंदे गटाला रोखण्यासाठी पुढील रणनितीबाबत चर्चा करण्यात आली.

    मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत (MLC Election 2022) मविआच्या पराभवानंतर मविआमध्ये (MVA) मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, मविआ बरखास्त होऊन सरकार कोसळणार का? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सुरतनंतर (Surat) आता जवळपास 44 आमदारांना (MLA) घेऊन गुहावटीत (Guhawati) येथे थांबले आहेत. त्यानंतर राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला असून, मविआमध्ये बैठकाचं (MVA meeting) सत्र सुरु आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, शिवसेना नेते अनिल देसाई आणि संजय राऊत यांची एक बैठक पार पडली. (MVA Meeting Sharad pawar, dilip walse patil, anil desai, sanjay raut) या बैठकीत राज्यात घडणाऱ्या पुढील घडामोडींबाबत चर्चा करण्यात आली तसेच, शिंदे गटाला रोखण्यासाठी पुढील रणनितीबाबत चर्चा करण्यात आली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुदधा शिवसेना भवनमध्ये जिल्हासंपर्कप्रमुखांची बेठक घेतली आहे.

    मविआच्या बैठकीनंतर शिवसेना खासदार संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी ‘फक्त कायदेशीर मार्ग नाही, सर्व प्रकारचे मार्ग अवलंबवणार. मी तुम्हाला यशवंतराव चव्हाण यांच्या साक्षीने आणि बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीला वंदन करुन सांगतो. “हम हार नही मानेंगे, आता आमची वेळ आहे,” अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाला ऑपन चॅलेंज दिलं आहे. (Eknath Shinde Group) यावेळी राऊतांनी शिंदे गटाला थेट आव्हान दिलं आहे.

    दरम्यान, पुढे बोलताना राऊत म्हणाले की, आम्हीच जिंकणार असल्याचा निर्धार राऊत यांनी केला आहे. हाऊसमध्ये देखील आम्ही जिंकू असेही राऊत यावेळी म्हणाले. आम्ही त्यांना परत येण्यासाठी दिलेली वेळ संपली आहे, ‘लढाई रस्त्यावर झाली तरीही आम्हीच जिंकू. ज्यांना आमचा सामना करायचा आहे त्यांनी मुंबईत यावं. त्यांना परत येण्याची संधी दिली होती. पण आता वेळ निघून गेली आहे,’ असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. आम्हाला हार मान्य नाही. आम्हीच जिंकू असा दावा सुद्धा राऊतांनी केला आहे.