पंकजाताई व भाजपची बदनामी आणि कुरघोडी करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही कठोर कारवाई करु; चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही पंकजा मुंडे ह्या भाजपच्या राष्ट्रीय नेत्या असल्याचं म्हटलं. तसेच पंकजाताई व भाजपची बदनामी आणि कुरघोडी करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही कठोर कारवाई करणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी इशारा दिलेला आहे.

    मुंबई- भाजपाच्या (BJP) महिला नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) ह्या पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. पंकजा मुंडे ह्या पक्षापासून दुरावला गेल्या असल्याचं चित्र आहे. मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपातील अनेक कार्यक्रमात दिसल्याच नाहीत. तसेच त्यांनी भगवान गडावर उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती. यानंतर जे पी नड्डा यांच्या मराठवाड्यातील कार्यक्रमात पंकजा मुंडे यांचे निमंत्रण पत्रिकेवर नावच नव्हते, या कार्यक्रमात मुंडे भगिनाना निमंत्रण नसल्यामुळं मुंडे समर्थक नाराज झाले आहेत, पंकजा मुंडेंना डावलले जाते का? पंकजा मुंडे पक्ष सोडणार का? अशी चर्चां सुरु आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule)  एका कार्यक्रमात पंकजा मुंडेंना बोलू दिले नाही, तो व्हीडिओ देखील व्हायरल होत आहे.

    …तर कठोर कारवाई करु

    दरम्यान, भाजपातील पंकजा यांच्या नाराजीवरुनच आता महाराष्ट्र काँग्रेसनं भाजपावर तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)  यांच्यावर टिका केली आहे. याबाबत बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे, तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही पंकजा मुंडे ह्या भाजपच्या राष्ट्रीय नेत्या असल्याचं म्हटलं. तसेच पंकजाताई व भाजपची बदनामी आणि कुरघोडी करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही कठोर कारवाई करणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी इशारा दिलेला आहे.

    भाजपामध्येच बदनाम करणारा एक गट

    पंकजा मुंडेंना डावलले जाते का? पंकजा मुंडे पक्ष सोडणार का? पंकजा मुंडे नाराज आहेत का? तसेच व्हिडिओ संदर्भातही बावनकुळे यांना प्रश्न विचारले असता, पंकजा मुंडेंच्या नाराजीबद्दल अफवा पसरवणारा एक गट भाजपातच आहे, असे त्यांनी म्हटले. भाजपामध्येच पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारा एक गट आहे. तेच ही बदनामी करत आहेत. कालच्या माझ्या संपूर्ण प्रवासात पंकजा पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहेत. त्या आमच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यामुळे त्यांना तुम्ही नंतर बोला, मी आधी बोलतो असे म्हटले. हाच त्यामागील आशय होता, असं स्पष्टीकरण बावनकुळेंनी व्हायरल व्हिडिओबद्दल दिलं आहे.