
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल (Climate Change) दिसत आहे. त्यात राज्यातील अनेक भागांत उष्णतेचा मोठा फटका (Heavy Heat) बसत आहे. येत्या दोन दिवसात मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात वातावरण अंशत: ढगाळ राहील, असा अंदाज आहे. तर नाशिक जिल्ह्यात हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल (Climate Change) दिसत आहे. त्यात राज्यातील अनेक भागांत उष्णतेचा मोठा फटका (Heavy Heat) बसत आहे. येत्या दोन दिवसात मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात वातावरण अंशत: ढगाळ राहील, असा अंदाज आहे. तर नाशिक जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये उन्हाचा कडाका वाढताना दिसत आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मंगळवारी उन्हाची तीव्रता अधिक होती. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात वातावरण कोरडे असून, कमाल तापमान हे सरासरी इतके होते. उत्तर महाराष्ट्रात उन्हासोबत उकाडाही जाणवत होता. पण आता पुढील दोन दिवस मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज आहे.
चक्रीवादळाची शक्यता
23 ते 26 मे दरम्यान चक्रीवादळाची शक्यता आहे. यादरम्यान अरबी समुद्रातून आर्द्रतेचाही पुरवठा होणार असल्याने जम्मू-काश्मीर, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश या राज्यांत जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.