यापुढेही राज्‍यात भारनियमन होऊ देणार नाही : नितीन राऊत

गेल्या बावीस तेवीस दिवसांपासून राज्यात कुठेही भारनियमन नाही. राज्यात भारनियमनाच्या केवळ वावड्या उठवल्या जात आहेत. यापुढेही राज्‍यात भारनियमन होवू देणार नसल्‍याची प्रतिक्रिया ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली.

    जळगाव : गेल्या बावीस तेवीस दिवसांपासून राज्यात कुठेही भारनियमन नाही. राज्यात भारनियमनाच्या केवळ वावड्या उठवल्या जात आहेत. यापुढेही राज्‍यात भारनियमन होवू देणार नसल्‍याची प्रतिक्रिया ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. ऊर्जामंत्री नितीन राऊत हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर यावेळी ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.

    नितीन राऊत नेमकं काय म्हणाले? 

    जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्राची पाहणी करुन आढावा घेतील. यावेळी राज्‍यातील भारनियमनावर बोलताना राऊत म्‍हणाले, की वादळ आले तर ट्रीपिंग होते. तसेच उष्णता वाढली तर ट्रान्‍सफार्मर जळू शकतो. याला भारनियमन म्हणता येणार नाही. सलग तीन– चार तास लाईट बंद राहिली तर भारनियमन असते. परंतु, राज्‍यात पुढेही भारनियमन होवू देणार नसल्‍याचे यावेळी नितीन राऊत म्हणाले.