1965 मधील युद्धात वापरलेल्या रणगाड्याचे तेल्हारा शहरात स्वागत

    अकोला (Akola) : 1965 मधील भारत-पाक युद्धात वापरलेल्या T55 रणगाड्याचे तेल्हारा शहरात जंगी स्वागत करण्यात आलं,केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या पुढाकारानं युद्धामध्ये वापरण्यात आलेला रणगाडा अकोल्यात दाखलं झाला आहे.

    तेल्हारा तालुक्यात तीन दिवस हा रणगाडा फिरणार असून T55 या रणगाड्याविषयी नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे. 1965 च्या युद्धाची आठवण आणि नवीन पिढीला युद्धाची माहिती देण्याचा प्रयत्न असणार आहे. युद्धात आपले सैनिक कशा प्रकारे लढले व रणगाड्याचा वापर कशा प्रकारे करण्यात आला याची माहिती देण्यात येणार. माजी केंद्रीयमंत्री खासदार संजय धोत्रे यांची संकल्पनेतून रणगाड्याला आणण्यात आलं. शहरवासियांसाठी रणगाडा औत्सुक्याचा विषय ठरला आहे.