कोरोनाची लस देणाऱ्या सायरस पुनावाला यांचा शरद पवारांना कोणता सल्ला? म्हणाले आता पवारांनी राजकारणातून…

शरद पवार यांचं वयावरुन सातत्याने चर्चा होते. ते सध्या 82 वर्षांचे आहेत. परंतु या वयात देखील ते पायाला भिगरी लावल्यासारखे राज्यातील दौरे करताहेत. तर दुसरीकडे भाजपाला रोखण्यासाठी इंडियाच्या बैठकीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

    पुणे : अजित पवारांनी जेव्हा राष्ट्रवादीतून बंड केल्यानंतर पवार साहेब थांबणार की नाही, तुम्ही राजकारणातून रिटायर कधी होणार, तुम्ही आता निवृत्ती घेतली पाहिजे असं म्हटलं होतं. यावर विविध प्रतिक्रिया आल्या होत्या. यानंतर कोरोना संकट काळात ज्यांनी संजीवनी सारखं औषधाची निर्मिती केली अशा सीरम इन्सिट्यूचे सर्वेसर्वा (सीरम इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग डायरेक्टर) सायरस पुनावाला (Cyrus Punawala) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल अतिशय मोठं वक्तव्य केलं आहे. पुनावाला यांच्या या सल्यामुळं सर्वाचा भुवया उंचावल्या आहेत. (What advice did Cyrus Punawala, who gave the corona vaccine, give to Sharad Pawar)

    काय म्हणाले पुनावाला…

    शरद पवार यांचं वयावरुन सातत्याने चर्चा होते. ते सध्या 82 वर्षांचे आहेत. परंतु या वयात देखील ते पायाला भिगरी लावल्यासारखे राज्यातील दौरे करताहेत. तर दुसरीकडे भाजपाला रोखण्यासाठी इंडियाच्या बैठकीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीतही प्रमुख घटक आहेत. तसेच ते अजित पवार गटांवर देखील टिका करताहेत. जाहीर सभा घेताहेत. त्यामुळं शरद पवार या वयात देखील तरुणाला लाजवेल असं काम करत आहेत, पण त्यांच्या वयावरुन बरीच चर्चा होत असताना, शरद पवार यांनी सामाजिक व राजकीय जीवनातून निवृत्त होण्याचा सल्ला सायरस पुनावाला यांनी दिला आहे.