आज राज्य आणि देशात काय आहेत महत्वाच्या घडामोडी? जाणून घ्या एका क्लिकवर…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दोन दिवस कर्नाटक (Karnataka) दौऱ्यावर जाणार आहेत. तर दुसरीकडे रत्नागिरीतील बारसू रिफायनरीचा सर्वे सुरू होणार असल्यामुळं वाद होण्याची शक्यता आहे. एक नजर टाकूया आज दिवसभरात कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत.

  मुंबई- आज दिवसभरात अनेक महत्वाचे कार्यक्रम तसेच काही घडामोडी आहेत. तर काही कोर्टात (court) सुनावण्या पार पडणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दोन दिवस कर्नाटक (Karnataka) दौऱ्यावर जाणार आहेत. तर दुसरीकडे रत्नागिरीतील बारसू रिफायनरीचा सर्वे आजपासून प्रत्यक्षात सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळं वाद होण्याची शक्यता आहे. एक नजर टाकूया आज दिवसभरात कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत.

  आजच्या महत्त्वाच्या घडामोडी…

  1 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवस कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत. आज आणि उद्या फडणवीस कर्नाटक निवडणूक प्रचारात फडणवीस सहभागी होणार

  2 शेतकरी प्रश्नांवरुन पुन्हा एकदा किसान सभेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. उद्यापासून किसान सभेच्या वतीनं अकोले ते लोणी अशा पायी मोर्चाला सुरुवात होणार आहे.

  3 राज्यात पुढील चार दिवस पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे… विदर्भात विजांच्या गडगडाटासह जोरदार गारपिटीची शक्यता… 25 एप्रिल रोजी काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे

  4 कोल्हापूर छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत कुणाचा कंडका पडणार याचा फैसला आज होणार आहे.. चुरशीने 91 टक्के मतदान झाल्यानंतर आज रमणमळा याठिकाणी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे…

  5 रत्नागिरी कोकणातल्या बारसू सोलगाव रिफायनरीचा सर्वे आजपासून प्रत्यक्षात सुरू होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 2 अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पाच पोलीस उपाधीक्षक, 1800 पोलीस अंमलदार असा पाऊस फाटा जिल्ह्यात तैनात झाले आहेत.

  6 जागतिक मलेरिया दिन आहे, हा दरवर्षी 25 एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.

  7 नाशिक  स्मार्ट सिटी अंतर्गत साकारतोय गोदापार्क… साडेतीन किलोमीटर पैकी दीड किलोमीटरचे काम जवळपास पूर्ण… ग्रीन झोन स्पिरीच्युअल, ओपन असे वेगवेगळे झोन करण्यात आले आहेत

  8 दिल्ली – न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही, बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटू पुन्हा आक्रमक; जंतर मंतरवर आंदोलन सुरु