आज राज्य आणि देशात काय आहेत महत्वाच्या घडामोडी? जाणून घ्या एका क्लिकवर…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 28 मे चा नियोजित कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला आहे. अमरावती शहरात आजपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील (Today) महत्वाच्या घडामोंडी…

  मुंबई– आज दिवसभरात अनेक महत्वाचे कार्यक्रम तसेच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. (Today IMP News) याव्यतिरिक्त कोर्टात (Court) सुनावणी पार पडणार आहे… तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 28 मे चा नियोजित कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला आहे. अमरावती शहरात आजपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील (Today) महत्वाच्या घडामोंडी…

  आज दिवसभरात महत्त्वाचे काय…

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 28 मे चा नियोजित कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला आहे.

  दिल्लीचे मुख्यमंत्री दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर

  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज उद्धव ठाकरे दुपारी 4 वाजता तर आज शरद पवारांची दुपारी 3 वाजता भेट घेणार आहेत.

  एकनाथ शिंदेंनी बोलावली पक्षातील खासदारांची बैठक, उद्धव ठाकरे लोकसभानिहाय मतदारसंघाचा आढाव घेत आहेत. मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार घोषित केलाय. रात्री 8 वाजता वर्षा निवास्थानी होणाऱ्या बैठकीत शिंदे लोकसभा निहाय कामाचा आढावा घेणार आहेत.

  मा.मुख्यमंत्री महोदय यांचे बुधवार, दि.२४ मे २०२३ रोजीचे कार्यक्रम

  सकाळी ११.३० वा.
  राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक.
  ● स्थळ :- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, नरीमन पॉईंट, मुंबई.

  दुपारी ०२.३० वा.
  जलयुक्त शिवार अभियान २.०, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना २.० व गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आढावा बैठक.
  ● स्थळ :- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरीमन पॉईंट, मुंबई.

  सायं. ०४.३० वा.
  मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम आय. आय. टी. मुंबई व आय. आय. एम. नागपूर या संस्थांसोबत होणाऱ्या सामंजस्य कराराप्रसंगी उपस्थिती.
  ● स्थळ :- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरीमन पॉईंट, मुंबई.

  सायं. ०५.०० वा.
  मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (शिवडी-न्हावा शेव्हा) रोड पाहणी दौरा.
  ● स्थळ :- शिवडी, मुंबई

  कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्जप्रकरणी आर्यन खानची सुटका करण्यासाठी 25 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाप्रकरणी केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबई क्षेत्राचे माजी संचालक समीर वानखेडे यांना सीबीआयनं आज बीकेसीतील मुख्यालयात पुन्हा हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत

  आमदार नितेश राणे यांची आज स. 11.30 वाजता पत्रकार परिषद

  पुण्यातील शिवाजीनगर जंबो कोविड सेंटरमध्ये सुजीत पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस यांच्या गुन्हेगारी निष्काळजीपणामुळे अनेक कोविड रुग्णाचा मृत्यू झाला, असा भाजप नेते किरीट सोमय्या यांचा दावा आहे. याविरोधात आज दुपारी 2 वाजता ते मानवी हक्क आयोग महाराष्ट्राकडे याचिका दाखल करणार आहेत.

  अमरावती शहरात आजपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे.

  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा आज तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. आज ते ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनीज यांच्या बरोबर द्विपक्षिय चर्चा करतील.

  स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पत्रकार परिषद घेणार आहेत, सकाळी 11.30 वाजता. यावेळी केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी आणि अनुराग ठाकूर उपस्थित असतील.