
संपूर्ण अधिवेशनात मणिपूर मुद्यावरुन विरोधकांनी सभागृहात सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनामुळे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसेच रस्त्यांची दुरवस्था आणि उघड्या मॅनहोल्सबाबत मुंबई उच्च न्यायालायत महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी...
मुंबई- आज दिवसभरात अनेक महत्वाचे कार्यक्रम तसेच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. तसेच कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे. दिल्लीत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. संपूर्ण अधिवेशनात मणिपूर मुद्यावरुन विरोधकांनी सभागृहात सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनामुळे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसेच रस्त्यांची दुरवस्था आणि उघड्या मॅनहोल्सबाबत मुंबई उच्च न्यायालायत महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी…
दिवसभरातील महत्त्वाचे काय…
दिल्लीत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. संपूर्ण अधिवेशनात मणिपूर मुद्यावरुन विरोधकांनी सभागृहात सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनामुळे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. त्याच पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या नेत्यांची आज बैठक पार पडणार आहे. लोकसभेत काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाच्या कारवाईमुळे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील खड्डे व रस्त्यांची दुरवस्था आणि उघड्या मॅनहोल्सबाबत मुंबई उच्च न्यायालायत महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे.
केंद्र सरकारकडून आज तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये सर्व खासदार आणि मंत्री सहभागी होणार आहेत. दिल्लीतील प्रगती मैदान ते कर्तव्य पथापर्यंत मोटारसायकलवरुन ही तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे.
एनडीएच्या प्रवक्त्यांची बैठक पार पडणार असून या बैठकीमध्ये अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे या बैठकीचं नेतृत्व करणार आहे. तसेच या बैठकीमध्ये अनुराग ठाकूर, चिराग पासवान, अनुप्रिया पटेल यांच्यासह एनडीएचे प्रवक्ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
देशभरातील न्यायाधीशांच्या सुरक्षेशी संबंधित मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालय आदेश देणार आहे. 021 मध्ये झारखंडमधील धनबाद येथील जिल्हा न्यायाधीशांच्या मॉर्निंग वॉक दरम्यान ऑटोरिक्षाच्या धडकेने झालेल्या संशयास्पद मृत्यूची दखल घेत सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी करण्यात आली आहे. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे.
पुण्यातील कोंढवा परिसरातून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची पोलीस कोठड संपत असल्याने शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान या चौकशीमध्ये आणखी कोणते खुलासे होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.