
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अहमदनगर दौऱ्यावर असणार आहेत. शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थिती लावणार, तसेच राज्यात १९ तारखेपासून मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी...
मुंबई- आज दिवसभरात अनेक महत्वाचे कार्यक्रम तसेच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. तसेच कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अहमदनगर दौऱ्यावर असणार आहेत. शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थिती लावणार, तसेच राज्यात १९ तारखेपासून मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी… (what are the important events in the state and country today know in one click)
दिवसभरातील महत्त्वाचे काय…
मा. मुख्यमंत्री महोदयांचे गुरुवार दि.१७ ऑगस्ट, २०२३ रोजीचे कार्यक्रम
( मुंबई /अहमदनगर जिल्हा दौरा)
सकाळी ११.३० वा.
शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थिती
● स्थळ :- शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ, काकडी, ता. कोपरगाव जि. अहमदनगर
सायंकाळी ०७.३० वा.
भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम
● स्थळ :- ताज लँडस् एन्ड, वांद्रे पश्चिम, मुंबई
मनसेचं मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्याबाबत आजपासून पनवेलमधून आंदोलनाला सुरुवात
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली उद्या गुरुवार दि. १७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वा. टिळक भवन येथे काँग्रेस पक्षाच्या सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश आघाडी संघटना, विभाग व सेल अध्यक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
ठाकर गटाकडून लोकसभा मतदारसंघातील आढावा बैठकसत्र मातोश्रीवरु सुरु आहे