आज राज्य आणि देशात काय आहेत महत्वाच्या घडामोडी? जाणून घ्या एका क्लिकवर…

विरोधकांची आघाडी इंडियाच्या मुंबईतील बैठकीसंदर्भात महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक होणार आहे. दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकालही आज लागणार आहे. तसेच राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी...

  मुंबई- आज दिवसभरात अनेक महत्वाचे कार्यक्रम तसेच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे. विरोधकांची आघाडी इंडियाच्या मुंबईतील बैठकीसंदर्भात महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक होणार आहे. दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकालही आज लागणार आहे. तसेच राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी…

  दिवसभरातील महत्त्वाचे काय…

  पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजगार मेळाव्याअंतर्गत सकाळी 10.15 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे 51 हजारांहून अधिक नवनियुक्त व्यक्तींना नियुक्ती पत्रांचं वाटप करणार आहेत, यावेळी पंतप्रधान संबोधित करणार आहेत.

  विरोधकांची आघाडी इंडियाच्या मुंबईतील बैठकीसंदर्भात महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक होणार आहे. अंतिम तयारीसंदर्भात आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होईल. राहुल गांधी यांचं मुंबईत जंगी स्वागत केलं जाणार आहे.

  दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकालही आज लागणार आहे.

  मुंबई कोर्टाने फटकारल्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे हनुमान चालीसा प्रकरण आणि राजद्रोह प्रकरणी मुंबईच्या सेशन कोर्टात उपस्थित राहणार आहेत.

  रांची – आज 29 वर्षांनंतर चारा घोटाळ्यातील 124 आरोपींविरोधात सीबीआय न्यायालयाचा निर्णय येणार आहे.

  पुण्यातील गणेश मंडळांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.

  वार्षिक सर्वसाधारण सभा आज होणार असून या अंतर्गत विविध घोषणा होण्याची शक्यता आहे.

  जपान आज चंद्रावर आपली मोहीम ‘मून स्निपर’ प्रक्षेपित करणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 5.56 वाजता प्रक्षेपण होणार आहे.

  आमदार नितेश राणे, यांची सकाळी 10.30 वाजता, पत्रकार परिषद, स्थळ- आदिश, जुहू तारा रोड, जुहू,