
आजपासून दोन दिवसीय जी -20 शिखर परिषद नवी दिल्लीत होणार आहे. तसेच राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी...
मुंबई- आज दिवसभरात अनेक महत्वाचे कार्यक्रम तसेच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे. तर आजपासून दोन दिवसीय जी -20 शिखर परिषद नवी दिल्लीत होणार आहे. तसेच राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी…
दिवसभरातील महत्त्वाचे काय…
आजपासून नवी दिल्लीत दोन दिवसीय जी -20 शिखर परिषद, यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भारतात आले आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठक देखील करतील. दिल्ली येथे आज आणि उद्या होणा-या G-20 बैठकीला उपस्थित राहणाऱ्या जगातील बलाढ्य राष्ट्रप्रमुख दिल्लीत आले आहेत.
कोलंबो – आशिया कप 2023 सुपर 4 मधील दुसरा सामना हा आज होणार आहे. श्रीलंका विरुद्ध बांगलादेश आमनेसामने असणार आहेत.
राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
सांगलीत काँग्रेसकडून महाराष्ट्र जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. सांगली जिल्ह्यातील जनसंवाद पदयात्राला कालपासून सुरुवात झाली आहे. 8 ते 14 सप्टेंबर याकालावधीत विविध तालुक्यात ही यात्रा काढण्यात येणार आहे