‘काँग्रेस दिशाभूल करतेय, राष्ट्रवादी ईडीच्या राजकारणात कमकुवत, उद्धव ठाकरेंनी वेळीच सावध व्हावं’, प्रकाश आंबेडकर हे काय म्हणाले ? ठाकरे गटानं वंचितसोबत स्वतंत्रपणे रिंगणात उतरण्याची इच्छा?

प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंशी केलेली युती ही शरद पवारांना रुचलेली नसल्याचं सांगण्यात येतंय. या युतीनंतर आंबेडकरांच्या वंचितला मविआत स्थान मिळणार का, या प्रश्नाचं थेट उत्तर अद्याप मिळालेलं नाही.

    मुंबई– उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाविकास आघाडीच्या (MVA) घोळात न येता, वेळीच सावध व्हावं, असा इशाराच वंचित बहुजनचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटाला दिला आहे. महाविकास आघाडी निवडणुकांच्या राजकारणात फार काळ तगू शकणार नाही, असे संकेतच त्यांनी या वक्तव्यातून दिले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी सोबत यावे अशी उद्धव ठाकरेंची जरी इच्छा असली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सध्याची स्थिती पाहता उद्धव ठाकरेंनी वेळीच सावध व्हायला हवं, असं सांगत आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंनी स्वतंत्रपणे रिंगणात उतरावं अशी इच्छाच व्यक्त केल्याचं मानण्यात येतंय. (Thackeray-Ambedkar)

    काँग्रेस दिशाभूल करते आहे- आंबेडकर

    नाना पटोले हे नागपुरात स्वतंत्र लढण्याची भाषा करतात, मुंबईत गेल्यानंतर मविआसोबत लढू असं म्हणतात. हा त्यांचा सूर दिशाभूल करण्याचा आहे, काँग्रेस नेमकं मविआसोबत राहील का, असा प्रश्नच यातून प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला आहे.

    राष्ट्रवादी ईडीच्या राजकारणात कमकुवत

    जयंत पाटील यांच्याप्रमाणे राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांची ईडी चौकशी सुरु आहे. त्यांना जर अटक की भाजपात प्रवेश असा प्रश्न केला तर ते भाजपाचा पर्याय निवडतील, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. सध्याच्या ईडीच्या राजकारणार सर्वाधीक कमकुवत पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचं त्यांनी म्हटलंय.

    उद्धव ठाकरेंनी स्वतंत्र रिंगणार उतरावे, व्यक्त केली इच्छा

    हे सगळं पाहून उद्धव ठाकरेंनी वेळीच सावध व्हावं, असा सल्ला त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. वंचितनं ठाकरे गटासोबत युती केलेली आहे. ठाकरेंनी निवडणुकांसाठी स्वतंत्र विचार करावा, अशी इच्छाच या निमित्तानं प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केल्याचं मानण्यात येतंय.

    वंचितला मविआत कितपत स्थान?

    प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंशी केलेली युती ही शरद पवारांना रुचलेली नसल्याचं सांगण्यात येतंय. या युतीनंतर आंबेडकरांच्या वंचितला मविआत स्थान मिळणार का, या प्रश्नाचं थेट उत्तर अद्याप मिळालेलं नाही. महाविकास आघाडीच्या जागावाटपातही वंचितला मिळणाऱ्या जागा या ठाकरे गटाला मिळालेल्या जागेतून मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळं आंबेडकर हे उद्धव ठाकरेंना स्वतंत्र विचार करण्याचा सल्ला देतायेत का, असाही प्रश्न विचारण्यात येतोय.