रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेतील मतदारांनी काय कमावले?; निलेश राणेंचा सवाल

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात स्थानिक खासदार म्हणून निवडून येऊन विनायक राऊत यांना काल ८ वर्षे पूर्ण झाली. या आठ वर्षाच्या कार्यकाळामध्ये मतदार संघाने काय कमावले? असा प्रश्न निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

    रत्नागिरी : सोमवारी २३ मे २०२२ रोजी लोकसभेचा ८ वर्षांचा काळ पूर्ण झाला. भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांच्या कामकाजाचा पंचनामा केला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात स्थानिक खासदार म्हणून निवडून येऊन विनायक राऊत यांना काल ८ वर्षे पूर्ण झाली. या आठ वर्षाच्या कार्यकाळामध्ये मतदार संघाने काय कमावले? असा प्रश्न निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

    निलेश राणे नेमकं काय म्हणाले? 

    आठ वर्षाच्या कार्यकाळामध्ये मतदार संघाने काय कमावले याचे ऑडिट व्हायला हवं , असं निलेश राणे यांनी सांगतानाच कोणतेही उल्लेखनीय कार्य या मतदार संघात घडलेले नाही यावर त्यांनी प्रकाश टाकला. स्थानिक खासदारांनी मतदारसंघात कोणतेही कारखाने, उद्योग आणले नाहीत, या काळात कोणतीही रोजगारनिर्मिती झाली नाही.

    तसेच आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. कोरोना काळात स्वतः पुढाकार घेऊन एकही कोरोना सेंटर त्यांनी बांधले नाही, असे बोलत निलेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे.