वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं मनसैनिकांना महत्त्वाचं आवाहन, नेमकं काय म्हणाले? : वाचा सविस्तर

वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यांना आणि राज्यभरातील मनसैनिकांना एका ऑडिओच्या माध्यमातून एक आवाहन केले आहे. १४ जून रोजी वाढदिवसानिमित्त आपल्याला कोणी भेटायला येऊ नये, अशी विनंती राज ठाकरे यांनी केली आहे.

    मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस असतो. त्यांचा वाढदिवसाला केवळ दोनच दिवस उरले आहेत. आता वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यांना आणि राज्यभरातील मनसैनिकांना एका ऑडिओच्या माध्यमातून एक आवाहन केले आहे.

    १४ जून रोजी वाढदिवसानिमित्त आपल्याला कोणी भेटायला येऊ नये, अशी विनंती राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरे यांची पायाची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती, कारण त्यांचा शरीरात कोरोना विषाणूच्या मृत पेशी आढळून आले, असे निदान डॉक्टरांनी केले होते. यामुळेच राज ठाकरे यांनी वाढदिवशी भेटीगाठी टाळल्या आहेत.

    भेटीगाठीतून पुन्हा कोरोना संसर्ग होण्याचा धोका असल्यामुळे, त्यांनी कोणालाही न भेटण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना आणि शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर आपण सर्वांना भेटणार आहोत, असे आश्वासनही राज ठाकरे यांनी दिले आहे.

    दरम्यान प्रत्येक वर्षी राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने मनसैनिक त्यांच्या निवासस्थानी जमतात. मोठी गर्दी १४ जून ला राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर होत असते.