महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांचं काय झालं? तेच शिंदे गटाचं होईल; ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा

12 आमदार यांची मुदत केव्हा संपली? पण अजून निवडणूक नाही. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून कायम ठेवावं. निवडणूक आयोगाने स्वायत्ता राखवी. निवडणूक आयोग सध्या स्वायत्ता राखून काम करत नाही, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला. आपल्या पक्षाला जनाधार मिळणार का? याबाबत ते अंदाज घेत आहेत.

    रत्नागिरी: ठाकरे गटाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटाची जोरदार खिल्ली उडवली आहे. महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत यांचे काय झाले? या दोन नेत्यांच भाजपच्या युतीत स्थान काय? असा सवाल करतानाच जानकर आणि खोत यांचं जे झालं तेच शिंदे गटाचं होईल. शिंदे गटाचाही वापर होईल, असा दावा भास्कर जाधव यांनी केला आहे. रत्नागिरी येथे मीडियाशी संवाद साधताना भास्कर जाधव यांनी हा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.

    12 आमदार यांची मुदत केव्हा संपली?
    12 आमदार यांची मुदत केव्हा संपली? पण अजून निवडणूक नाही. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून कायम ठेवावं. निवडणूक आयोगाने स्वायत्ता राखवी. निवडणूक आयोग सध्या स्वायत्ता राखून काम करत नाही, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला. आपल्या पक्षाला जनाधार मिळणार का? याबाबत ते अंदाज घेत आहेत. त्यामुळे राज ठाकरे कुणाच्या कार्यक्रमाला गेले तर त्याबाबत बोलणे चुकीचं आहे. भाजपचा सध्या एक कलमी कार्यक्रम सुरु आहे. देशात छोटे पक्ष शिल्लक न ठेवण्याचं काम भाजप करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

    भाजपला सत्तेची नशा
    भाजपच्या डोक्यात सध्या सत्तेची नशा आहे. महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांचे काय झाले? शिंदे गटाचाही वापर होणार. भाजप त्यांनाही सोडणार नाही, असं सांगतानाच दापोलीत पुढचा आमदार ठाकरे गटाचाच असणार आहे. हे मी ठरवलं आहे. उद्या दापोलीत ठाकरे गटाचा आमदार निवडून आलेला दिसेल, असा दावाही त्यांनी केला.